Watch Funny Video: नेहमी गाडी चालवताना सावधपणे गाडी चालवावी, असा सल्ला आईवडील देत असतात. अनेकदा काही लोक रॅश ड्रायव्हिंग (Rash Driving) करतात. तर काहीजण इतरांच्या जीवाची पर्वा न करता गाडी चालवत असतात. सोशल मीडियावर त्यांना हेवी ड्रायव्हर (Heavy Driver) म्हटलं जातं. असाच हेवी ड्राईव्हरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना (Funny Accident Video) दिसतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू देखील आवरनार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्कूटी आणि बाईक चालवणाऱ्या मुलींची (Girls Driving Video) नेहमी खिल्ली उडवली जाते. त्याचे व्हिडिओ देखील नेहमी व्हायरल होताना दिसतात. अशातच तीन मुलींचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Trending Video) होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडू शकतो की, चूक नेमकी कोणाची?


आणखी वाचा  - Viral Video: अन् तरुणाने धावत्या कारमधून नोटा फेकण्यास सुरुवात केली, व्हिडीओ व्हायरल


सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका मुलामुळे मुली नाल्यात पडल्याचं व्हिडिओमध्ये पहायला मिळत आहे. व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. मुलगी आरामात स्कूटी चालवत आहे. तेवढ्याच अचानक थोडं पुढं गेल्यावर दोन मुली नाल्यात पडल्या. स्कूटीवर स्वार असलेला एक मुलगा रस्त्याच्या समोरच्या बाजूने आला आणि दोघांच्या गाड्या धडकल्या.


पाहा Video  



गाडीवर तीन मुली होत्या. त्यातील मागील बाजूस बसलेली मुलगी बाहेरच्या दिशेने पडली तर पहिल्या दोन मुली शेजारी असलेल्या नाल्यात पडल्या. तर दुसरीकडे समोरच्या बाजूने आलेल्या मुलाला नेमकं काय झालं? हे सुधरलंच नाही. मुली नाल्यात पडल्याचे पाहून आजूबाजूचे लोक तातडीने मदतीसाठी धावले. पण मुलगा शांतपणे स्कूटीवर बसून राहिलेला दिसतोय. 


चूक नेमकी कोणाची?


दरम्यान, चूक नेमकी कोणाची? पोराची की पोरींची? असा सवाल आता सोशल मीडियावर उपस्थित केला जातोय. व्हिडिओ पाहून तुम्हीच सांगा...चूक नेमकी कोणाची?