नवी दिल्ली : पोलिसांनी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका मदरशावर कारवाई केली आहे. पोलिसांनी मदरशांमधून अनेक मुलींना मुक्त केले आहे. मदरशांच्या व्यवस्थापकावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जामिया खदीजातूल लीलनवातच्या संचालकावर या मुलींना लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. मो तैयब याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मदरशांमध्ये जेव्हा पोलिसांची टीम पोहोचली तेव्हा एक धक्कादायक घटना समोर आली. 


चौकशीदरम्यान विद्यार्थ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले की, आरोपी तय्यब जिया कार्यालयात बोलावून त्याचे पाय दाबायला लावायचा. तो मुलींची छेड देखील काढायचा. त्याला विरोध केल्यास तो मुलींना मारहाण देखील करत होता. जेव्हा हे सगळं सहन नाही झालं तेव्हा या मुलींना एक पत्र खाली टाकून आजुबाजुच्या लोकांना ही घटना सांगितली.


पोलीस आणि प्रशासनाने शुक्रवारी रात्री ५१ विद्यार्थिंनीना येथून मुक्त केलं. पोलिसांनी मुलींचा जबाब नोदंवला आहे. पोलीस आता या मदरशावर कारवाई करण्याची तयारी करत आहे. हा मदरशा रजिस्टर आहे की नाही याबाबत पोलीस तपास करत आहे.


मदरशाचे संस्थापक मोहम्मद गिलानी यांचा आरोप आहे की, तैयब हा मदरशा हडपण्याचा प्रयत्न करत होता. हा मदगशाची काळजी घेण्यासाठी त्याला नेमलं होतं. पण त्याने मनमानी करत येथे हॉस्टेल सुरु केलं आणि फक्त मुलींनाच येथे प्रवेश दिला जात होता. संस्थापकांना तो फसवणुकीच्या प्रकरणात फसवण्याची देखील धमकी देत होता.