मुंबई: गेल्या काही दिवसांत सतत सोन्या चांदीचे दर वरखाली होत आहेत. कालच्या तुलनेत पुन्हा आज सोन्या चांदीचे दर वधारले आहेत. सोन्याच्या दरात 170 रुपयांनी तेजी आहे. सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याला पुन्हा एकदा झळाळी आली आहे. 170 रुपये सोनं वाढून आजचा दर 47 हजार 560 रुपयांवर आला आहे. सोमवारी सोन्याचा दर 10 ग्रॅम करता 47216 रुपये एवढा होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वायदा बाजारात सोमवारी चांदीच्या दरात 230 रुपये वाढ झाली असून 61951 रुपये प्रति किलोग्रॅम दर होता. तर मंगळवारी 800 रुपयांनी चांदीचे दर वधारले असून 63 हजार 158 रुपयांवर पोहोचला आहे. तर दिवाळीपर्यंत पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार 24 कॅरेट सोन्याची किंमत 47 हजार 646 आहे. तर 23 कॅरेट सोन्यासाठी नागरिकांना 47 हजार 455 रुपये मोजावे लागणार आहेत. 22 कॅरेट सोन्यासाठी 43 हजार 644 तर 18 कॅरेज सोन्यासाठी 35 हजार 735 रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर सोन्याचे दर गगनाला भिडले होते. त्यातुलनेत सोन्याचे दर आता स्वस्तच आहेत असं म्हणायला हरकत नाही. 


2020 मध्ये कोरोना काळात सराफ बाजारात सोन्याचे दर 24 कॅरेट सोन्याचे दर 56 हजार 200 रुपये होते. आता 10 तोळे सोन्यासाठी 47 हजार 646 रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजे याची तुलना केली तर सोन्याचे दर त्यावेळी पेक्षा 8554 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. येत्या काळात पुन्हा सोन्याला चकाकी येईल आणि दर वाढतील असं सांगितलं जात आहे. 


गेल्या 4 महिन्यातील सर्वांत निच्चांक स्तरावर 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 45600 रुपये इतका होता. या गिरावटीनंतर सोन्याच्या दरात सुधारणा झाली. मात्र धातूचा दर 10 ग्रॅम करता 56,200 रुपयांपर्यंत पोहोचला होता. आता सोन्याच्या दराने 10 ग्रॅम करता 9000 रुपयांचा निच्चांक रेकॉर्ड गाठला आहे. सोन्याच्या गुंतवणूकदारांना UBS Group ने सतर्क केलं आहे. कोरोनानंतर आर्थिक व्यवहारात सुधारणा होत आहे. अमेरिकेतील जॉब मार्केटचा डाटा अपेक्षापेक्षा चांगला आहे.