मुंबई : सोन्याच्या भावामध्ये मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा भाव ३१ हजार रुपये एक तोळा झाला आहे. मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या भावामध्ये तब्बल ६५० रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये ९९.९९ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ३१ हजार रुपये तोळा तर ९९.५ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ३०,८५० रुपये तोळा एवढी आहे.


चांदीचे भाव उतरले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे सोन्याचे भाव वाढले असतानाच चांदीच्या भावामध्ये मात्र ३५० रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा भाव ४१,५०० रुपये प्रतिकिलो आहे.


उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचण्यांचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झालीय. याचाच परिणाम म्हणून सोन्याचे दर वधारलेत. हायड्रोजन बॉम्ब चाचणीसोबतच सोन्याचे दर वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे भारत आणि दक्षिण कोरियामध्ये झालेला करार.


या करारानुसार, भारताने कोरियातून सोन्याची नाणी आयात केली तर त्यावर इम्पोर्ट ड्यूटी लागत नाही. गेल्या दोन महिन्यात दहा टन नाणी आयात झालीत. शिवाय त्यावर जीएसटीही लागत नव्हता. त्यामुळे सोन्याचा दर कमी होता.  सरकारने हे सोनं बाजारात आणून ते वितळवलं. परंतु सरकारला अपेक्षित महसूल मिळाला नाही. तसंच दीड महिन्यानंतर ही आयात बंद झाल्याने सोन्याचे दर वधारल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी म्हटलं आहे.