मुंबई : रशिया युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धाला अद्यापही पुर्णविराम मिळालेला नाही. त्यांमुळे जगभरातील आर्थिक व्यवहारांवर परिणाम झाला आहे. जगभरात सोने चांदीचे दर वाढले आहेत. भारतातही लग्नसमारंभ तसेच सणासुदीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात सोन्या चांदीच्या दरांत वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाल्याची दिसून येत आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत सोन्याच्या दर स्थिर होते. कालच्या उसळीनंतर आज सोने स्थिर राहिल्याचे दिसून आले आहे. MCX वर सोन्याची किंमत  53228 रुपये प्रति तोळे इतकी होती. तर चांदीची किंमत 69935 रुपये प्रति तोळे इतकी होती. 


आज मुंबईतील सोन्याच्या दरांमध्येही फारशी उलथापालथ दिसून आली नाही. काल सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली होती. आजही ते दर स्थिर राहिल्याचे दिसून आले आहे. 
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर  55200 रुपये प्रति तोळे इतका आहे. तर चांदीचे दर 71800 रुपये प्रति किलो इतके आहे.


सोन्याचे दर सध्या वाढलेलेल दिसून येत असले तरी, ते आपल्या उच्चांकी पातळीपेक्षा अद्यापही 2 ते 3 हजारांनी स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दर 56 हजार रुपये प्रति तोळ्याच्या पुढे गेले होते.