Gold Price Rate Today: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा चढ-उतार होताना दिसत आहे. सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात सोन्यात नरमाई दिसून येत होते. तर, चांदी थेट 900 रुपयांनी घसरली आहे. MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर आज सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. तर, चांदीदेखील 909 रुपयांनी घसरुन 93,739 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. काल चांदी 94,648 वर स्थिरावली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफा बाजारात स्थानिक विक्रेते आणि सराफा व्यावसायिक यांच्या मागणीत वाढ झाल्याने सोन्याचे दर वधारले आहेत. तसंच, 7 नोव्हेंबर रोजी फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात करण्याचा निर्णय आला तर संपूर्ण आठवड्यात सोन्याच्या किंमतीत चढ उतार होण्याची शक्यता आहे. आज 6 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 110 रुपयांनी वधारले आहेत. त्यामुळं 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 80,350 रुपयांवर स्थिरावलं आहे. 


आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 73,650 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर 17 कॅरेट सोनं 80 रुपयांनी वाढलं आहे त्यामुळं सोनं 60,260 रुपयांवर पोहोचले आहे. आज एक ग्रॅमसाठी 8.035 रुपये मोजावे लागणार आहेत. 


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  73,650 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  80,350 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  60,260 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,365 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8, 035 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6, 026 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   58,920 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   64,280 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    48,208 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 73,650 रुपये
24 कॅरेट-  80,350 रुपये
18 कॅरेट- 60,260 रुपये