Gold Silver Price Today:  जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमतीत सुरू असलेल्या अस्थिरतेचा परिणाम भारतीय वायदे बाजारावरही दिसून येत आहे. आज आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घट झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Gold Price Today 3rd August 2022: जागतिक बाजारातून मिळालेल्या संकेतांदरम्यान आज आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जागतिक घडामोडींचा परिणाम यावेळी जागतिक बाजारावर दिसून येत आहे. अमेरिका-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारापासून ते सराफा बाजारामध्ये घसरण झाली आहे.


आज जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली असली तरी या वाढीचा भारतीय वायदे बाजारावर कोणताही परिणाम झालेला नाही. एमसीएक्सवर आज सोन्याचा भाव 10 रुपयांनी घसरला आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव आज 241 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे.
 
मुंबईत आज सोन्याचा भाव 210 रुपयांनी घसरण 51,440 रुपये प्रति तोळे होते. तर चांदीचे दर 500 रुपयांनी घसरून 57,500 रुपये किलो इतके होते.


तज्ज्ञ काय म्हणतात?


सोन्या-चांदीच्या किमतीत झालेल्या बदलाबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जागतिक बाजारात ज्या प्रकारे तणाव दिसून येत आहे, त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या किमतीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सध्या सोन्याच्या किंमतीवर दबाव दिसू शकतो, पण महागाई आणि मंदीचा धोका कमी होताच सोन्याचे भाव पुन्हा एकदा वाढतील. तज्ज्ञांच्या मते, या वर्षाच्या अखेरीस सोने 54 हजारांची पातळी पकडू शकते.


लेटेस्ट दर तपासा


तुम्हाला सोन्या-चांदीचे रोजचे लेटेस्ट दर जाणून घ्यायचे असतील, तर तुम्ही घरबसल्या ही माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला मोबाईल क्रमांकावरून 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल.


यानंतर लवकरच, तुम्हाला मोबाईल फोनवर एक एसएमएस येईल, ज्यामध्ये देशातील सोन्या-चांदीच्या लेटेस्ट दरांची माहिती दिली जाईल.