नवी दिल्ली : तुमच्याकडे मारूती कार असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 


ग्राहकाचं हित


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुमच्या मारूती कारमध्ये काही बिघाड झाला आणि कंपनी तो दुरुस्त करू शकली नाही तर कंपनी तुमच्या कारच्या किंमतीएवढे पैसे परत करणार आहे. एका ग्राहकाच्या तक्रारीचं निवारण न झाल्याने त्याने ग्राहक मंचाकडे धाव घेतली. तक्रारीचं निवारण करतांना ग्राहकाच्या बाजूने निर्णय लागून कंपनीला कारच्या किंमतीएवढे पैसे परत करण्याचा आदेश दिला गेला.


नेमकं काय झालं होतं


आंध्र प्रदेशातील डॉक्टर केएस किशोर यांनी 10 जानेवारी 2003 रोजी मारूती सुझुकी अल्टो एल एक्स 800 कार विकत घेतली होती. ही कार त्यांनी 3.3 लाखांना घेतली होती. कारच्या गिअरमध्ये आवाज येत असल्याची आणि जर्क असल्याची त्यांची 
तक्रार होती. डीलर आणि कंपनी त्यांच्या तक्रारीचं निवारण करू शकले नाहीत. परिणामी त्यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली.


पैसे परत करण्याचा आदेश


ग्राहक मंचाने कंपनीला कारच्या किंमतीएवढे पैसे परत करण्याचा आदेश दिला.