नवी दिल्ली : मॉल, हॉटेल, विमानतळांवर एखादी वस्तू घेताना 'एमआरपी' पेक्षा जास्त दर द्यावा लागतो. त्यामुळे अनेकवेळा ग्राहक आणि व्यावसायिकांत वाद होत होतो. मात्र, अनेक तक्रारींची दखल घेत आता केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 'एक वस्तू, एकच किंमत' असा निर्णय घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॉल्स, हॉटेल, रेल्वे आणि विमातळांवर ग्राहकांची होणारी लूट थांबवण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. त्यामुळे यापुढे  उत्पादनांवरील एमआरपीनुसारच पैसे घ्यावे लागणार आहेत. या ठिकाणांवर वस्तूंची विक्री एमआरपीहून अधिक पैसे घेऊन केली जाते. त्यामुळे एक वस्तू, एक किंमत असा निर्णय करण्यात आलाय.


एक किंमत निर्णय सरकारच्या आदेशानुसार हा नियम १ जानेवारी २०१८ पासून लागू होणार आहे. एकच वस्तू वेगवेगळ्या किंमतीत विकणे आता चित्रपटगृहे, मॉल, विमानतळांना महागात पडू शकते. 


अनेक ठिकाणी एक लिटर पाण्याची बाटली २० रूपयांना मिळते. तीच पाण्याची बाटली विमानतळावर ५० रूपयांना विकली जाते. असेच चित्र मॉल आणि चित्रपटगृहात पाहायला मिळते. या ठिकाणी एमआरपीहून अधिक मूल्य घेतले जाते. हा बदल वैधमापन शास्त्र २०११ च्या नियमानुसार करण्यात आला असून १ जानेवारी २०१८ पासून हा बदल लागू होईल.  


या आदेशानुसार वैधमापन शास्त्रविभागाने पेप्सी, कोका कोला, रेडबुल, युरेका फोर्ब्स, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आदी कंपन्यांना एमआरपीनुसारच वस्तू आणि उत्पादनांची विक्री करण्यासंबंधी सूचना दिल्यात.