मुंबई: तुम्हीही पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. पीपीएफ खात्यात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी हे नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अल्पबचत योजनांचे नियम सरकार वेळोवेळी बदलत असतात. अशा परिस्थितीत या बदलांबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. सरकारने पीपीएफचे काही नियमही बदलले आहेत. येथे आम्ही तुम्हाला पीपीएफशी संबंधित 5 बदलांबद्दल सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीपीएफ कर्ज घ्यायचं असेल तर...


जर तुम्हाला पीपीएफ खात्यावर कर्ज घ्यायचे असेल, तर अर्जाच्या तारखेच्या दोन वर्षे आधी, तुम्ही खात्यातील पीपीएफ शिल्लक रकमेच्या 25 टक्केच कर्ज घेऊ शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही 31 मार्च 2022 रोजी कर्जासाठी अर्ज केला असेल. तर दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 31 मार्च 2020 ला PPF खात्यात 1 लाख रुपये असतील तर तुम्हाला त्यातील 25 टक्के म्हणजेच 25 हजार कर्ज मिळू शकते.


व्याज दर कपात


पीपीएफ खात्यातील शिल्लक रकमेवर कर्ज घेतल्यास व्याजदर २ टक्क्यांवरून १ टक्के करण्यात आला आहे. कर्जाची मूळ रक्कम भरल्यानंतर तुम्हाला दोनपेक्षा जास्त हप्त्यांमध्ये व्याज भरावे लागेल. दर महिन्याच्या १ तारखेपासून व्याज मोजले जाते.


पीपीएफ खाते 15 वर्षांनंतरही सुरू राहील


जर तुम्ही 15 वर्षांनंतर गुंतवणूक करण्यास तयार नसाल, तर तुम्ही या मुदतीनंतर तुमचे पीपीएफ खात्यात गुंतवणूक न करता सुरू ठेवू शकता. 15 वर्षांनंतर पैसे जमा करण्याचे तुमच्यावर कोणतेही बंधन नाही. मॅच्युरिटीनंतर, जर तुम्ही पीपीएफ खात्याची मुदत वाढवायचं ठरवत असाल, तर तुम्ही आर्थिक वर्षातून एकदाच पैसे काढू शकता.


खाते उघडण्यासाठी हा फॉर्म भरा


पीपीएफ खाते उघडण्यासाठी आता फॉर्म-ए ऐवजी फॉर्म-1  सबमिट करावा लागेल. पीपीएफ खाते 15 वर्षांनंतर (ठेवीसह) मुदतपूर्तीच्या एक वर्ष आधी विस्तारासाठी फॉर्म एच ऐवजी फॉर्म-4 मध्ये अर्ज करावा लागेल.


महिन्यातून एकदा रक्कम जमा केली जाऊ शकते


पीपीएफ खात्यात 50 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ही रक्कम वार्षिक किमान 500 रुपये किंवा त्याहून अधिक असावी. पीपीएफ खात्यात तुम्ही वर्षभरात 1.5 लाख रुपये जमा करू शकता. केवळ यावरच तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळतो. याशिवाय तुम्ही पीपीएफ खात्यात महिन्यातून एकदाच पैसे जमा करू शकता.