नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये अनेक समस्या उद्भवल्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी, ऑटो सेक्टरमध्ये तेजी आणण्यासाठी सरकारकडून पाऊलं उचलली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत वाहन खरेदी करता येऊ शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, उद्योग मंत्रालयाने एक प्रस्ताव तयार करुन पाठवला आहे. प्रस्तावानुसार,  GST, Cess आणि Road Tax मध्ये वाहन उद्योगाला दिलासा मिळू शकेल. यात किंमती कमी झाल्यामुळे वाहनांच्या किंमतीही कमी होऊ शकतात. त्याशिवाय संपूर्ण देशात Road Tax एकसमान ठेवण्याविषयीही चर्चा सुरु आहे. सध्या, देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळा Road Tax असल्याने वाहनांच्या ऑन रोड किंमतीत मोठा फरक पडतो.


१ ऑगस्टपासून पैशांसंबंधी 'या' ६ नियमांत बदल होणार


याशिवाय सरकार लवकरच Vehicle Scrappage Policyबाबतही घोषणा करु शकते. हे धोरण जाहीर झाल्यास देशांतर्गत वाहन उद्योगाला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. शिवाय या उद्योगाची वाहन क्षमता वाढवण्याचाही सरकारचा मानस आहे.


या व्यतिरिक्त विविध देशांशी मुक्त व्यापार करारावर Free Trade Agreement स्वाक्षरी करण्याबाबतही सरकार विचार करत आहे, जेणेकरुन निर्यातीत-एक्सपोर्टमध्ये वाढ होऊ शकेल. या सर्व बाबींवर, सरकार एकत्र निर्णय घेणार नसून वेगवेगळ्या वेळी घोषणा करणार आहे.


 


ग्राहकांना सरकारकडून नवी ताकद; सहज मिळणार या प्रश्नांची उत्तर