१ ऑगस्टपासून पैशांसंबंधी 'या' ६ नियमांत बदल होणार

देशात 1 ऑगस्टपासून पैशांसंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये बदल होणार आहेत.

Jul 29, 2020, 13:32 PM IST

बँक लोन, पीएम किसान स्किम, बँक मिनिमम बॅलेन्स, बचत खाते, ई-कॉमर्स कंपन्या यांच्या नियमांत बदल होतील.

 

1/6

मोटर व्हिकल इन्शुरन्समध्ये बदल झाल्याने 1 ऑगस्टपासून नवीन कार किंवा बाईक खरेदी करणं काही प्रमाणात स्वस्त होऊ शकतं. विमा नियामक विकास प्राधिकरणनुसार (IRDAI), 1 ऑगस्टपासून नवीन कार खरेदीदारांना 3 आणि 5 वर्षे विमा घेण्यास भाग पाडले जाणार नाही. तसंच वाहन विम्यावर कमी पैसे खर्च करावे लागतील.

2/6

कॅश इनफ्लो आणि डिजिटल ट्रान्झेक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी, अनेक बँकांनी 1 ऑगस्टपासून कमीत-कमी बँलेन्सवर शुल्क-चार्ज आकारण्याची घोषणा केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, एक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आरबीएल बँकमध्ये शुल्क आकारण्यात येणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सेव्हिंग अकाऊंटमध्ये कमीत-कमी 2000 रुपये बॅलेन्स ठेवावा लागणार आहे. आधी कमीत-कमी बॅलेन्सची मर्यादा 1500 रुपये होती. बॅलेन्स कमी असल्यास मेट्रो आणि शहरी भागात 75 रुपये, अर्ध-शहरी भागात 50 रुपये आणि ग्रामीण भागात 20 रुपये प्रति महिना चार्ज लावला जाईल.

3/6

आरबीआयने RBI अलीकडे बचत खात्यातील व्याज दरात बदल केला आहे. नवीन दर 1 ऑगस्टपासून लागू होतील. बचत खात्यांना 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर वर्षाकाठी 4.75 टक्के व्याज मिळेल. 1 ते 10 लाखांपर्यंतच्या ठेवींवर 6 टक्के आणि 10 लाख ते 5 कोटी रुपयांच्या ठेवींवर 6.75 टक्के व्याज दिले जाईल. डेबिट कार्ड हरवल्यास किंवा खराब झाल्यास 200 रुपये चार्ज लागेल. आता ग्राहकांना एका महिन्याला एटीएममधून 5 वेळा पैसे काढता येणार आहेत.   

4/6

ई-कॉमर्स कंपन्यांना (E-commerce companies) 1 ऑगस्टपासून वस्तू अर्थात प्रोडक्टचं ओरिजन सांगणं आवश्यक करणार आहे. वस्तू कुठे, कोणी बनवली आहे हे सांगणं गरजेचं असणार आहे. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडने (DPIIT) सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना 1 ऑगस्टपर्यंत आपल्या नवीन प्रोडक्ट लिस्टिंगचं कंट्री ऑफ ओरिजन (country of origin) अपडेट करण्यास सांगितलं आहे. मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी हे करण्यात येत आहे.   

5/6

1 ऑगस्टपासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा सहावा हप्ता जमा करण्यात येणार आहे. ही योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत सरकारने देशातील 9.85 कोटी शेतकर्‍यांना खात्यात रोख रक्कम जमा केली आहे. या योजनेचा पाचवा हप्ता 1 एप्रिल 2020 रोजी जारी करण्यात आला होता.

6/6

तेल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी LPG गॅस सिलेंडर आणि विमान इंधनाच्या नव्या किंमतींची घोषणा करतात. गेल्या काही महिन्यांपासून या किंमतींमध्ये वाढ होत आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजीही LPG दरात वाढ होऊ शकते.