SBI vs Post Office: गुंतवणूक करताना सर्वात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे विश्वास. फसवणूक होऊ नये म्हणून अनेकजण सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. यामध्येही विशेषत: पोस्ट ऑफिस (Post Office) आणि एसबीआयच्या (SBI) योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. पण अनेकजणांना पोस्ट ऑफिस आणि एसबीआय या दोन्हीपैकी कोणत्या योजनेमध्ये गुंतवणूक करायला हवी याबद्दल संभ्रम निर्माण झालेला असतो. आता याविषयी काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण, आज आम्ही तुम्हाला तुमचा जास्त फायदा कोणत्या योजनेमध्ये होऊ शकतो याबद्दल माहिती सांगणार आहोत.


SBI FD Rates


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय अशी ओळख असणारी बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक (SBI). एसबीआयतर्फे खातेदारांना फिक्स्ड डिपॉजिटची (FD) सुविधा दिली जाते. एसबीआयने एफडीच्या व्याज दरामध्ये वाढ केली आहे. मागील 13 ऑगस्टला एसबीआयने वाढवलेल्या व्याज दरामुळे 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर खातेदारांना 2.90 ते 5.65 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा फायदा मिळू शकतो. त्यासोबतच, ज्येष्ठ नागरिकांना 3.4 टक्के ते 6.45 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा फायदा मिळतो.


Post Office द्वारे मिळणारा नफा


पोस्ट ऑफिस (Post Office) देखील खातेदारांसाठी अनेक योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकीची संधी देत असते. पोस्ट ऑफिसच्या एफडीबद्दल सांगायचं झालं तर 2 वर्षांच्या एफडीवर 20 बेसिस पॉईंटची वाढ केलेली आहे. सध्या खातेदारांना या एफडीवर 5.7 टक्के आणि 3 वर्षांच्या एफडीवर 5.8 टक्क्यांचा फायदा मिळत आहे. त्याचबरोबर, 5 वर्षांच्या टर्म डिपॉजिटमध्ये खातेदारांना 6.7 टक्क्यांच्या दरात फायदा मिळेल.


Kisan Vikas Patra मुळे किती फायदा मिळू शकेल?


सरकारने किसान विकास पत्राच्या दोन्ही कालावधीमध्ये बदल केला आहे. किसान विकास पत्र 123 महिन्यांच्या डिपॉजिटसाठी 7 टक्के व्याज देईल. त्यासोबतच, 124 महिन्यांच्या डिपॉजिटवर किसान विकास पत्र 6.9 टक्के व्याज देत आहे. जर या तिन्ही डिपॉजिटची तुलना केली तर पोस्ट ऑफिसच्या एफडी जास्त आकर्षक ठरते.


सर्वात उत्तम योजना कोणती?


या सर्व योजनांद्वारे मिळणाऱ्या व्याजाची तुलना केली तर पोस्ट ऑफिसच्या एफडीमध्ये (Post Office FD) गुंतवणूक केली तर जास्त फायदा मिळू शकतो. म्हणजेच, या इतर योजनांपैकी पोस्ट ऑफिसच्या योजनेत (Post Office Scheme) गुंतवणूक करायला पाहिजे.