Indore job aspirants protest : सरकारी नोकरीसाठी हजारो तरुण प्रयत्न करत असतात. मात्र, कधी पेपर फुटी, प्रश्नपत्रिकांमध्ये फेरफरा, कॉपी असे अनेक गैर प्रकार घडतात. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात अनेक राज्यांमध्ये सरकारी परीक्षा भरतीत गोंधळ पहायला मिळतात. मध्य प्रदेशात अत्यंत विचित्र प्रकार घडला आहे.  सरकारी नोकर भरतीच्या परिक्षेत एका उमेदवाराल 100 पैकी 101 मार्क मिळाले आहेत. या प्रकारामुळे परीक्षा देणारे विद्यार्थी चिडले आणि त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन आंदोलन केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एमपी इज अमेझिंग, मोस्ट अमेझिंग... अशी मध्य प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाची टॅग लाईन आहे. या टॅगलाईन प्रमाणेच मोस्ट अमेझिंग प्रकार मध्य प्रदेश सरकारच्या नोकर भरती परिक्षेत घडला आहे. एका उमेदवाराला 100 पैकी 101 मार्क मिळाल्याने परीक्षा देणारे इतर विद्यार्थी प्रचंड चिडले आहेत. या निकालाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित करत बेरोजगार तरुणांनी इंदूरमध्ये जोरदार निदर्शने केली. भरती परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत, निष्पक्ष चौकशीची मागणीही आंदोलन करणाऱ्या तरुणांनी केली आहे.


वन आणि तुरुंग विभागाच्या 2023 या वर्षाच्या भरतीसाठी एकत्रित परीक्षा घेण्यात आली. वनरक्षक, क्षेत्ररक्षक (कार्यकारी) आणि जेल रक्षक (कार्यकारी) या पदांसाठी  ही भरती आहे. भोपाळ येथील मध्य प्रदेश कर्मचारी निवड मंडळामार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल 13 डिसेंबर रोजी जाहीर झाला. मात्र, हा निकाल पाहून परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना धक्का बसला.


या परिक्षिते काही उमेदवारांना 100 पैकी 101.66 गुण मिळाले आहेत. इतकचं नाही तर निवड यादीत यांना अव्वल स्थान मिळाले आहे. इतकचं नाही तर एकूण निकाल पाहिला असता या यादीतील दोन टॉपर हे एकाच जिल्ह्यातील आहेत. यामुळे भरती प्रक्रियेत फेरफार झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. ग्वाल्हेर आणि भोपाळ केंद्रातील विद्यार्थी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले.  चौकशी करून संबंधित केंद्रांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे केली आहे. संबधीत प्रकरणाबाबात कारवाई न कल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.