गुजरात निवडणूक 2022 | `मोदी गेले, तर गुजरातही...`; मतदानापूर्वींच Ravindra Jadeja ने शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा Video
Gujarat Assembly Election 2022 : रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा ही भाजपाच्या तिकीटावर जामनगर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र जडेजाचे वडील कॉंग्रेसचा प्रचार करताना दिसत आहेत
Gujarat Assembly Election 2022 : गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालीय. सौराष्ट्र-कच्छ प्रांत व दक्षिणेकडील 19 जिल्ह्यांतील 89 मतदारसंघांत गुरुवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि आपमध्ये मुख्य लढत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने या टप्प्यात 89 जागांवर तर आपने 88 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकीत भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) जामनगर मतदारसंघात भाजपकडून उमेदवार म्हणून रिंगणात उतरली आहे. मतदानापूर्वी, जडेजाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच त्याने या पोस्टद्वारे 'गुजरातींना' सल्लाही दिला आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
जडेजाने ट्विटरवर पोस्ट केलेला व्हिडिओ बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या कार्यक्रमातील आहे. "माझं हेच म्हणणं आहे की, नरेंद्र मोदी गेले, तर गुजरातही जाईल. जर नरेंद्र मोदींना तुम्ही बाजुला केलंत तर तुमचं गुजरात गेलं. हेच मी अडवानींजवळ बोललेलो आहे", असे बाळासाहेब ठाकरे या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. यासोबत गुजराती लोकांनो अजूनही वेळ आहे, समजून घ्या, असं कॅप्शन देखील जडेजाने दिलं आहे.
रिवाबा जडेजाने 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2017 साली जामनगर मधून निवडून आलेले भाजपच्या धर्मेंद्र सिंग जडेजा यांना पक्षाने तिकीट नाकारत रिवाबा यांना संधी दिली आहे.
घरातूनच विरोध
रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा काँग्रेसच्या उमेदवार आहेत. जडेजाचे वडीलही काँग्रेसचा प्रचार करत आहेत. निवडणुकीपूर्वीच रिवाबा यांनी आपल्या कुटुंबात कोणतेही मतभेद नसून केवळ विचारधारेचा मुद्दा असल्याचे स्पष्ट केले होते. रवींद्र जडेजाचे वडीलांनी काँग्रेससाठी मते मागत आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.