अहमदाबाद : गुजरातमध्ये भाजप पु्न्हा एकदा सत्तेत आल्यामुळे गुजरातचा विकास पु्न्हा एकदा शहाणा झाला असेच म्हणावं लागेल.


विकासाचं मॉडेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमधल्या निवडणुकामध्ये प्रचारादम्यान एक शब्द परवलीचा झाला होता. किंबहुना याच एका शब्दाभोवती गुजरातची निवडणुक फिरत होती तो म्हणजे "विकास". गुजरातच्या विकासाचं मॉडेल हे प्रचाराच्या केंद्रस्थानी होतं. 


आक्रमक राहुल


राहुल गांधीनी आक्रमकपणे प्रचार करताना मोदींच्या गुजरात विकास मॉडेलवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. आपल्या भाषणांमध्ये त्यांनी "विकास कहा गया. विकास बोल बोल के पागल हो गया" या प्रकारे भाजपच्या गुजरात विकास मॉडेलची खिल्ली उडवली होती. या आक्रमक कॅच लाईनने सुरूवातीच्या काळात भाजप बॅकफूटवरसुद्धा गेला होता. 


अटीतटीची लढत


मोदी प्रचारात उतरल्यानंतर मात्र भाजप आक्रमक झाला आणि राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर देताना "हू छू विकास, हू छू गुजरात" या घोषणेचा वापर करण्यात आला. तो बऱ्याच अंशी प्रभावीसुद्धा ठरला. या विकासाच्या कॅच लाईनवर सोशल मीडीयातून बरच लिहलं, बोललं गेलं. विकास या शब्दाची टिंगलसुद्धा उडवली गेली.


भाजपची सरशी


सरतेशेवटी कॉँग्रेसने दिलेल्या कडव्या झुंजीनंतर भाजप गुजरातमध्ये विजयश्री खेचून आणण्यात यशस्वी झालं. आता पु्न्हा एकदा देशभरात गुजरातचं विकास मॉडेल हे चर्चेच्या केंद्रस्थानी येईल. भाजप जिंकल्यामुळे विकासाचा विजय झालाय आणि राहुल गांधी म्हणत होते त्याप्रमाणे तो वेडा झालेला नाही, असं भाजप म्हणता येईल. 
थोडक्यात काय तर काही काळासाठी वेडा झालेला विकास सियाना हो गया, असं म्हणावं लागेल.