धाकट्या सुनेसाठी अंबांनीनी उघडली तिजोरी! 640 कोटींचा व्हिला, 21 कोटींचे दागिने आणि...

| Jul 16, 2024, 19:00 PM IST
1/8

धाकट्या सुनेसाठी अंबांनीनी उघडली तिजोरी! 640 कोटींचा व्हिला, 21 कोटींचे दागिने आणि...

2/8

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरला पार पडला. 12 जुलैला झालेल्या या विवाह सोहळ्याला आता चार दिवस उलटून गेल्यानंतरही या सोहळ्याची चर्चा रंगली आहे. लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

3/8

अनंत-राधिकाच्या लग्नात बॉलिवूड पासून हॉलिवूड पर्यंत आणि क्रिकेट जगतापासून उद्योगजगतापर्यंत विविध क्षेत्रातील दिग्गज आणि सेलिब्रेटी हजर होते. लग्नाला उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांना अंबानी कुटुंबियांकडून महागडी रिटर्न गिफ्टही देण्यात आली. यात दोन कोटींच्या घड्याळाचाही समावेश आहे.

4/8

 मुकेश आणि नीता अंबानी यांनी आपल्या धाकट्या सुनेसाठी काय गिफ्ट दिलं याची चर्चा आता रंगली आहे. अंबानी कुटुंबियांनी आपल्या धाकट्या सुनेसाठी तिरोजीच खुली केली आहे. अनंत आणि राधिकासाठी गिफ्ट म्हणून दुबईजवळच्या पाम जुमेरहा इथं एक शानदार विला दिला आहे

5/8

दुबईतल्या उच्चभ्रू परिसरात हा व्हिला आहे. जुमेरा भागात असलेल्या या व्हिलाची किंमत जवळपास 640 कोटी असल्याचं सांगतिलं जातंय. या व्हिला 10 बेडरुम आणि एक प्रायव्हेट पूल आहे. 

6/8

अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे महागड्या कारचं कलेक्शन आहे. यानंतरही मुकेश आणि नीता अंबानी यांनी अनंतला बेंटले कॉन्टिनेंटल जीटीसी स्पीड कार भेट दिली आहे. या कारची किंमत 5 कोटी 42 लाख रुपये इतकी आहे. 

7/8

नव्या नवरीसाठी नीता अंबानी यांनी कस्टम मेड ज्वेलरी आणि Cartier brooch भेट केला आहे. या दागिन्यांची किंमत जवळपास 21 कोटी 70 लाख रुपये इतकी आहे. 

8/8

याशिवाय मुकेश आणि नीता अंबानी आपल्या धाकट्या सुनेला हिरे आणि मोतींचा हार भेट दिला आहे. भारतीय रुपयात याची किंमत 108 कोटी इतकी आहे.