कोण आहे 'ही' हिजाब गर्ल? अनंत-राधिकाच्या लग्नात हिचीच चर्चा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही लग्नासाठी देश-विदेशातील पाहुणे आले होते. या लग्नामध्ये एका 'हिजाब गर्ल' ची खूप चर्चा झाली. सगळ्या सेलिब्रिटिंसोबत या सुंदर मुलीचे फोटो आहेत.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच सात वर्षांच्या प्रेमानंतर आता लग्न झालं आहे. 3 जुलैपासून या शाही सोहळ्याचे विधी सुरु होते. 12 जुलै रोजी यांचा शाही सोहळा पार पडला. या सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांपैकी एका 'हिजाब गर्ल' ची जोरदार चर्चा रंगली आहे.
ही सुंदर मुलगी म्हणजे रानिया येहिया. जी हिजाब परिधान करून प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावत होती आणि मुकेश अंबानीपासून जॉन सीनापर्यंत बॉलीवूडच्या अनेक मोठ्या स्टार्ससोबत दिसली होती. आता या हिजाब गर्लच्या सौंदर्याचे फोटो व्हायरल होत आहेत आणि प्रत्येकाला तिच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे.