गुजरात निवडणूक २०१७ : गुजरातमध्ये मोठा ट्विस्ट, मुख्यमंत्री रुपाणी ८०० मतांनी पिछाडीवर
भाजपा ८४ तर कॉंग्रेस ८८ जागांवर आघाडीवर आहे.
गुजरात : गुजरातमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. भाजपाचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे ८०० मतांनी पिछाडीवर पाहायला मिळत आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, भाजपा ८४ तर कॉंग्रेस ८८ जागांवर आघाडीवर आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक पार पडली. पहिल्या टप्प्यासाठी 9 डिसेंबरला (89 विधानसभा जागा) तर, 14 डिसेंबरला (93 विधानसभा जागा ) दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. गुजरातसोबतच हिमाचल प्रदेशमध्येही निवडणुका पार पडल्या. या मतदानाची एकूण मतमोजणी आज (सोमवार) पार पडत आहे. गुजरात निवडणुकीसाठी 50,128 पोलिंग बूथ बनविण्यात आले होते. गोवा नंतर हिमाचल प्रदेश आणि गुजरात ही दोन राज्ये अशी आहेत. ज्यात व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला गेला.