Tennis Star Madhwin Kamath Arrested : भारतीय क्रीडा क्षेत्रात धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका टेनिस खेळाडूवर (Tennis Player) मुलीला बदनाम करणं आणि तिला सेक्स वर्कर म्हणून बोलल्या प्रकरणी सायबर क्राईमने (Cyber Crime) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुलाला अटक करण्यात आली आहे. गुजरात राज्यातल्या अहमदाबादमध्ये (Ahmedabad) ही घटना घडली आहे. याप्रकरणी माधविन कामत (Madhwin Kamath) या टेनिस खेळाडूला अटक करण्यात आलं आहे. 22 वर्षांच्या एका मुलीने माधविन याच्यावर बदनामी केल्याचा आरोप लावला आहे. माधविनने संपूर्ण शहरात मुलीचे पोस्टर लावत तिची बदनामी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोस्टरवर मुलीचा नंबर छापला
टेनिस खेळाडू माधविनने मुलीचे संपूर्ण अहमदाबाद शहरात पोस्टर लावले. यासाठी त्याने इन्स्टाग्रामवरुन मुलीचे फोटो डाऊनलोड केले. या फोटोचा वापर त्याने पोस्टर छापण्यात केला. धक्कादायक म्हणजे या पोस्टरवर त्याने मुलीचा मोबाईल नंबर छापला आणि त्या खाली सेक्स वर्कर असल्याचा उल्लेखही केला. मोबाईल नंबर छापल्याने या मुलीला अनोळखी नंबरवरुन अनेक फोन आले. फोटोबरोबर छेडछाड केल्याचा आरोपही मुलीने केला आहे. अनोळखी लोकांनी फोन करुन मुलीला अर्वाच्य भाषेत संभाषण केलं. यामुळे मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. 


सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल
या घटनेमुळे मुलीची आणि तिच्या कुटुंबियांची समाजात प्रचंड बदनामी झाली. यानंतर मुलीने अहमदाबाद सायबर क्राईम सेलमध्ये मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सायबर क्राईनने तात्काळ तपास सुरु केला. सायबर क्राईमच्या तपासात मुलीने केलेले आरोप खरे साबित झाले. माधविननेच मुलीचे फोटो मॉर्फ करत अहमदाबाद शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टर लावले. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही मिळवले आहेत. 


पुरावाच्या आधारे पोलिसांनी माधविनविरुद्ध गुन्हा दाखल केला. पण ज्यावेळी पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले त्यावेळी माधविन परदेशात टेनिस खेळण्यासाठी गेल्याचं कळलं. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरोधात LOC नोटीस जारी केली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माधविन आणि तक्रारदार मुलगी आधीपासून एकमेकांना ओळखत होते. पण काही कारणाने दोघांमध्ये बोलणं बंद झालं. याचा बदला घेण्यासाठी माधविनने मुलीचे फोटो इन्स्टावरुन डाऊनलोड करत त्याचे पोस्टर छापले आणि शहरभर लावले.