मुंबई : तिहार कारागृह नंबर तीनमध्ये निर्भयाच्या दोषींच्या फाशीची तयारी सुरू झाली आहे. 'फाशी घर' यासाठी तयार केलं जात असून त्याची साफसफाई सुरू केली आहे. तिहार कारागृह प्रशासन राष्ट्रपतींकडे दोषी विनय शर्माची दया याचिका फेटाळली जाण्याची वाट पाहत आहेत. तिहार कारागृहाचे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवल्यावर कारागृहात दोषींच्या फाशीची तयारी सुरू केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेवर हल्ला करणारा आरोपी अफजल गुरूच्या फाशीनंतर तिहार कारागृह क्रमांक तीनमध्ये असलेले फाशी घर हे बंदच आहे. फाशी घर तेव्हाच खुले केले जाते जेव्हा एखादी व्यक्ती परवानगीने भेट द्यायला येते. निर्भया हत्याकांडाच्या आरोपींनी राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवली आहे. मात्र असे असले तरीही कारागृहात त्यांच्या फाशीची तयारी केली आहे. या तयारीमध्ये फाशी घर स्वच्छ करणे आणि फाशीकरता दोरखंड मागवणे यासारखी तयारी केली जाते. 


सुत्रांकंडून मिळालेल्या माहितीनुसार पाच दिवसांपूर्वीच लोक निर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांनी फाशी घरची तपासणी करून गेले आहेत. त्यांच्या तपासणीत, काही ठिकाणी तोडफोड झाली आहे तसेच साफसफाईची गरज देखील आहे. (निर्भया बलात्काराचे आरोपी म्हणतात, ...तर फाशीची गरज काय ?)


एका फाशीच्या दोरखंडाकरता दहा हजार रुपये 


 बिहारच्या बक्सर कारागृहात 10 दोरखंड मागवले आहेत. शंभर मीटर या दोरखंडाची किंमत ही 10 हजार रूपये आहे. तसेच कारागृह प्रशासनाने देशातील इतर कारागृहात पत्र लिहून त्यांच्या जल्लादांची माहिती मागवली आहे. गरज लागल्यास त्यांना बोलावण्यात येईल अशी माहिती देखील दिली आहे. 


टीव्हीच्या बातम्यांकडे दोषींची नजर 


निर्भया प्रकरणातील दोषींची नजर सतत टीव्हीच्या बातम्यांकडे असते. आरोपींच्या फाशीची मागणी होत असल्याच्या बातम्या पाहून दोषी थोडे शांत झाले आहेत. याचमुळे दररोज सकाळ, संध्याकाळ त्यांची मेडिकल तपासणी केली जाते. तसेच मंडोली कारागृहातून पवन गुप्ताला देखील तिहार कारागृहात आणल्यानंतर सगळ्यांना एकत्र फाशी दिली जाण्याची चर्चा आहे. मात्र त्यांचे वकील एपी सिंह यांच्या म्हणण्यानुसार, दोषींकडे आणखी काही पर्याय आहेत. 



जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आरोपींसोबत ठेवण्यात आलंय 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्भयाच्या दोषींचा एक एकटे ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आरोपींना ठेवण्यात आले आहेत. या आरोपींचा स्वभाव शांत असून निर्भयाच्या दोषींना समजावण्याकरता यांना सांगितलं आहे.