Unique Chocolate Day 2023 Celebration: रोझ डे (Rose Day) झाला....प्रपोज डे (Propose Day) झाला... आता चॉकलेट डे (Chocolate Day)... पहिल्या दोन दिवशी तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला असावा. 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे सेलिब्रेट (Chocolate Day 2023) केला जातोय. प्रेमामधील समर्पण दाखवण्याचा दिवस म्हणजे चॉकलेट डे. कोणत्याही सण आणि आनंदाच्या प्रसंगी तोंड गोड करण्याची प्रथा आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रेमीयुगुलांनी (Love Couple) चॉकलेट डे साजरा करून आपल्या प्रियजनांचं तोंड गोड करतात. मात्र, वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रथा दिसून येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुतेक मुलींना चॉकलेट आवडते. या दिवशी मुलं मुलींना चॉकलेट देऊन नात्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न करतात, पण असाही एक देश आहे जिथं फक्त मुलीच चॉकलेट देतात. या देशात मुलं चॉकलेट दिलं जात नाही, तर त्यांना चॉकलेटच्या माध्यमातून प्रेमप्रस्ताव (love proposal) मिळतो. थोडं वेगळं वाटेल पण असं असतंय. कोणत्या देशात असेल अशी परंपरा? (Unique chocolate day 2023 celebration in japan girls gave chocolate to boy marathi news)


जपानमध्ये (Japan) अनोखी परंपरा -


जपानमध्ये देखील व्हॅलेंटाइन वीक (Valentine week) जल्लोषात साजरा केला जातो. 9 फेब्रुवारीला चॉकलेट डेला फक्त जपानमधील (Unique Chocolate Day 2023 Celebration) महिलाच चॉकलेट देतात. महिला पुरुषांना चॉकलेट देऊन हा दिवस साजरा करतात. महिला पुरुषांना दोन प्रकारची चॉकलेट देतात.


होनमेई चोको, गिरी चोको असतं तरी काय?


होनमेई चोको (honmei-choko): जपान म्हणजे शिस्तप्रिय देश. जपानमध्ये होनमेई चोकोला  (honmei-choko) 'चॉकलेट ऑफ लव' म्हटलं जातं. प्रेम व्यक्त करण्यासाठी खासकरून हे चॉकलेट दिलं जातं. ज्यावेळी महिला कोणा एका मुलाला पसंत करते. त्याला देण्यासाठी हे चॉकलेट वापरलं जातं.


आणखी वाचा - Propose Day 2023: प्रेमही आहे, पण सांगताही येत नाहीये? काळजी करु नका; हे मेसेज वापरून म्हणून टाका I LOVE YOU


गिरी चोको (giri-choko):  कर्टसी चॉकलेट नावाने प्रसिद्ध असलेलं गिरी चोको (giri-choko) ला एक खास महत्त्व आहे. ज्यावेळी मुलगी आपल्या प्रेयकराला प्रपोज करते. त्यावेळी त्यावेळी ती हे चॉकलेट देऊन प्रेमात गोडवा आणण्याचा प्रयत्न करते.


दरम्यान, व्लेंटाईन वीकला (Valentine's Week) तुमच्या पार्टनरला म्हणजेच लग्न झालेल्या नवऱ्याला स्पेशल फिल करण्यासाठी तुम्ही चॉकलेट डेच्या दिवशी हा केक घरी सहज बनवू शकता आणि खास व्लेंटाईन साजरा केला जाऊ शकतो.