Mutual Fund Investment: सध्या आपल्याला कमावता कमावता आपले पैसे कुठतरी सेव्हिंग अकांऊट (Saving Account) नाहीतर म्यूच्युअल फंडमध्ये (Mutual Fund) ठेवायला आवडतात. सध्या असाच एक म्युच्युअल फंड तुमचा खिशा चांगलाच भरू शकतो. एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या इक्विटी विभागानं एक नवी योजना आणली आहे. यातून गुंतवणूकदार त्याला हवे तेव्हा पैसे काढू शकतो. ही एनएफओ (NFO) 11 नोव्हेंबर पासून सदस्यत्वासाठी खुली झाली आहे. त्याचसोबतच ही योजना 25 नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

₹ 100 पासून गुंतवणूक? 
एचडीएफसी (HDFC Mutual Fund) म्युच्युअल फंडानुसार एचडीएफसी बिझनेस सायकल फंडातील (HDFC Business Cycle Fund) गुंतवणूक (Investment) किमान 100 रुपयांपासून सुरू केली जाऊ शकते. ही एक इक्विटी योजना आहे. वाटपाच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत या योजनेतून बाहेर पडल्यावर 1% एक्झिट लोड तुम्हाला भरावा लागेल. 


हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल


एक्झिट लोडचा अर्थ काय? 
हा शुल्क आहे जो म्युच्युअल फंड हाऊसद्वारे दिला जातो. जेव्हा गुंतवणूकदार गुंतवणूक तारखेच्या एका निश्चित कालावधीनंतर योजनेतून बाहेर पडतो तेव्हा त्याला एक ठराविक रक्कम भरावी लागते. 


काय म्हणतात तज्ञ? 


हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा
म्युच्युअल फंड हाऊसच्या मते, ज्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन भांडवल वाढ, उत्पन्न हवे असते त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला गुंतवणूक तज्ञ देतात. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही. कृपया शेअर मार्केट तज्ञांचा सल्ला घ्यावा.)