बापरे ! गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे ६९७७ रुग्ण वाढले; १५४ जणांचा मृत्यू
भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १,३८, ८४५ इतकी झाली आहे.
नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ६९७७ रुग्ण आढळून आले आहेत. तर १५४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात तब्बल सात हजार रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्ययंत्रणांची चिंता वाढली आहे. भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १,३८, ८४५ इतकी झाली आहे. यापैकी ७७१०३ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ५७७२० जण बरे होऊन घरी परतले आहेत. देशभरातील कोरोनाच्या एकूण मृतांचा आकडा ४०२१ इतका असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
मुंबई पोलिसांनी सोमय्यांना दिलेलं उत्तर आदित्य ठाकरेंना 'आवडलं'
देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहेत. राज्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 50 हजार 231वर गेली आहे. राज्यात सध्या 33 हजार 988 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी 30, 542 कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. मुंबईत आतापर्यंत 988 जण कोरोनामुळे दगावले आहेत.
Lockdown : दोन महिन्यांनंतर 'फिर से उड चला...'
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत लॉकडाऊनमुळे देशात कोरोनाबाधितांचा आकडा खूपच कमी असल्याचे म्हटले होते. भारतात लॉकडाऊन हा एखाद्या लसीप्रमाणे परिणामकारक ठरला. देशात वेळेत लॉकडाऊन घोषित केल्यामुळे रुग्णांचे प्रमाण दुप्पटीने कमी झाल्याचा दावा डॉ. हर्षवर्धन यांनी केला होता. तसेच सध्या भारतात कोरोनावरील चार लसींवर संशोधन सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली. लवकरच या लसींची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.