हिमाचल विधानसभेसाठी ७४ टक्के मतदान
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ६८ जागांसाठी आज मतदान झालं. या निवडणुकीसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ७४ टक्के मतदान झाले.
शिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ६८ जागांसाठी आज मतदान झालं. या निवडणुकीसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ७४ टक्के मतदान झाले.
२०१४ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशात ६४.४५ टक्के मतदान झाले होते. तर २०१२ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७३. ५१ टक्के मतदान झाले होतं, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.
निवडणुकीच्या रिंगणात ६२ आमदारांसह ३३७ उमेदवाराचं भविष्य मतदार आज पेटीत बंद झाले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सत्ताधारी कॉंग्रेस आणि माजी मुख्यमंत्री धुमल यांच्या नेतॄत्वात भाजप सर्वच ६८ जागांवर लढत आहे. तर बसपा ४२, माकपा १४, स्वाभिमान पार्टी आणि लोक गटबंधन पक्ष सहा-सहा जागांवर लढत आहेत.
भाकपा तीन जागांवर लढत आहे. प्रचार चांगलाच रंगला कॉंग्रेस आणि भाजपच्या स्टार प्रचारकांनी ४५० पेक्षा जास्त प्रचार रॅली केल्या. भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी क्रमश: सात आणि सहा रॅलींना संबोधित केले. तर कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तीन रॅली काढल्यात.