कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा 30 जानेवारीला बंगाल दौर्‍यादरम्यान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची भेट घेऊ शकतात. सौरव गांगुली राजकारणात येण्याबाबतच्या चर्चांना यामुळे पुन्हा एकदा उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी सौरव गांगुलीला हृदय विकाराचा झटका आला होता. त्यामुळे तो खासगी रुग्णालयात दाखल होता. त्याच्यावर अँजिओप्लास्टी झाली. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यापासून सौरव घरी विश्रांती घेत आहे. पुढच्या काही दिवसांत त्याच्यावर दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौरव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांची पत्नी डोना गांगुली यांना फोन करून दादांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती आणि आता बंगाल दौर्‍यादरम्यान ते सौरव गांगुलीची भेट घेऊ शकतात. राजकीय दृष्टीकोनातून हे फार महत्वाचे मानले जाते. यामागे एक कारण आहे.


सौरव गांगुली यांना पक्षात घेण्यासाठी बंगाल भाजप सध्या बरेच प्रयत्न करत होते. सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हा प्रयत्न थांबविण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री आता सौरव गांगुलाच्या घरी जाणार असल्याने नव्याने चर्चांना उधाण आले आहे. सौरव गांगुलीला थेट मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या विरोधात बंगाल भाजपला उभे करायचे आहे. सौरव गांगुलीने मात्र अनेकदा म्हटलं आहे की राजकारणात येण्याची त्याची कोणतीही योजना नाही. 


सौरव गांगुलीचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांशी खूप चांगले संबंध आहेत. अमित शाह यांचा मुलगा जय शहा बीसीसीआयचे सचिव आहे आणि ते देखील रुग्णालयात दाखल केल्यानंतर सौरव गांगुलीला पाहण्यासाठी कोलकाता येथे आले होते.