नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या तणावपूर्ण वातावरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे घाटी दौरा करणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री संसदीय सत्रानंतर तीन दिवसांच्या जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत.


विधानसभा निवडणुकांची तयारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित शाह हे विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी पार्टीच्या कार्यक्रमात सहभागी होतील. अमित शाह काश्मीर घाटीतील वेगवेगळ्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. तसेच या ठिकाणी सदस्यता अभियानासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत करणार आहेत. संसदचे सत्र 7 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आले आहे. 


जम्मू-काश्मीर प्रशासनाने अमरनाथ यात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच काश्मीरमध्ये आलेल्या सर्व पर्यटकांना काश्मीर सोडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे.


दहशतवाद्यांकडून अमरनाथ यात्रेवर हल्ला होण्याची शक्यता होती. पण ती सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडली आहे. सुरक्षा रक्षकांना रस्त्यात एक स्नाईपर गन सापडल्याने ही शक्यता आणखी वाढली आहे.


सर्च ऑपरेशनदरम्यान सापडलेली स्नाईपर ही अमेरिकन बनावटीची आहे. एम-24 ही रायफल सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतली आहे. सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराने शुक्रवार एकत्र पत्रकार परिषद घेतली.


लेफ्टिनंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी म्हटलं की, 'अमरनाथ यात्रेच्या रस्त्यालगत एका गुप्त ठिकाणी एम-24 स्नाईपर रायफल दुर्बिनीसह सापडली आहे.' प्रशासनाने काश्मीरमधील पर्यटकांना परत जाण्यास सांगितलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हालचाली वाढल्या आहेत. शुक्रवारी सकाळी ही बॉर्डर परिसरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं.


'वाईट परिणाम होतील'


जम्मू काश्मीर सध्याच्या परिस्थितीवरून पीडीपी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी रविवारी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महबूबा मुफ्ती यांनी आर्टीकल 35 ए आणि कलम 370 संदर्भात केंद्र सरकार जे करु पाहत आहे त्याचे परिणाम वाईट होतील.


सरकारने जम्मू काश्मीर संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करावी. इथे नक्की काय होतंय याबद्दल आम्हाला कोणी काहीच सांगत नसल्याचे त्या म्हणाल्या.