Remove Cylinder Rust Stains: अधिकाधिक घरांमध्ये LPG गॅस सिलिंडर वापरला जातो. स्वयंपाकघरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या गॅस सिलिंडरमुळं अनेकदा गृहिणींना त्रासाचा सामना करावा लागतो. सिलिंडरवर असणारा गंज, त्यामुळं जमिनीवर पडणारे ओरबडे, जमून राहणारे गंजाचे डाग या साऱ्याचा प्रचंड त्रास होतो. हे डाग स्वच्छ करताना होणारी दमछाक आणि ते कितीही प्रयत्न करुनही न निघणं हासुद्धा एक मनस्ताप. अशा वेळी काही सोपे उपाय तुम्हाला मोलाची मदत करु शकतात. माहितीयेत का असे उपाय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिंबू आणि बेकिंग सोडा (Lime, Baking soda) 
सिलिंडरचे डाग घालवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचा वापर करु शकतात. यासाठी 1 कप पाणी, 2 चमचे बेकिंग सोडा आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण जिथं डाग आहेत अशा टाईल्सवर टाका तिथं ते मिश्रण पसरवून जोर देऊन घासा. काही क्षणात फरशी स्वच्छ झालेली असेल. 


मीठ आणि व्हिनेगर (Salt , vinegar)
व्हिनेगरच्या मदतीनंही हे डाग दूर केले जाऊ शकतात. यासाठी एक कप व्हिनेगरमध्ये मीठ टाकून एक मिश्रण तयार करा. आता कोणताही ब्रश किंवा स्क्रबच्या मदतीनं ते स्वच्छ करा. 


अधिक वाचा : Belly Fat : प्रसूतीनंतर पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 'हे' उपाय ठरतील फायदेशीर


टूथपेस्ट 
तुमच्या किचनम्ये पांढऱ्याशुभ्र टाईल्स असल्यास तुम्ही Toothpaste चाही वापर करु शकता. या तंत्रानं तुम्ही मोठ्या प्रमाणात हे डाग स्वच्छ करु शकता. यासाठी पेस्ट डाग असणाऱ्या ठिकाणी लावा आणि स्क्रबनं तो भाग स्वच्छ करा. नंतर पाण्यानं तो स्वच्छ करा. 


(वरील संदर्भ सर्वसामान्य माहितीच्या आधारे घेण्यात आलेला आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)