Belly Fat : प्रसूतीनंतर पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

जाणून घेऊया प्रसूतीनंतर बेली फॅट कसं कमी करावं? 

Updated: Sep 28, 2022, 07:34 AM IST
Belly Fat : प्रसूतीनंतर पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 'हे' उपाय ठरतील फायदेशीर title=

मुंबई : प्रसूतीनंतर महिलांचं वजन वाढणं सामान्य गोष्ट आहे, कारण फॅट हे पोटाच्या वरील बाजूवर जमा होतं. ही चरबी तुमच्या शरीरावर दीर्घकाळ दिसू शकतं कारण प्रसूतीनंतर पोटाचे स्नायू सैल होतात. अनेकदा आहारात बदल करूनही फॅट कमी होण्याचं नाव घेत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही इतर पद्धतींचा अवलंब करावा. जाणून घेऊया प्रसूतीनंतर बेली फॅट कसं कमी करावं? 

मसाज करा

पोटाची चरबी कमी करण्यासाठी मसाजची मदत घ्यावी. तेल मसाज करा, वेदना कमी होईल आणि तुमचे स्नायू देखील टोन्ड होतील. यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की, सिझेरियनच्या 3 आठवड्यांनंतरच मसाज करा, टाके बरे होईपर्यंत मसाज करू नका. 

योगाची मदत घ्या

योगाच्या मदतीने तुम्ही बेली फॅट कमी करू शकता. सी-सेक्शन प्रसूतीनंतर योग हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. प्रसूतीनंतर 6 ते 8 महिन्यांनी योगासनं सुरू करावीत. योग करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योगासने केल्याने स्नायू मजबूत होतील. तुम्ही नौकासन किंवा बोट पोझ करून पाहू शकता.

ब्रेस्‍टफीडींग

आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी स्तनपान फायदेशीर मानलं जातं. स्तनपान केल्याने केवळ ब्रेस्टच्या कॅन्सरचा धोका कमी होतो शिवाय कॅलरीज देखील बर्न होतात, स्तनपान करताना भरपूर ऊर्जा खर्च होते. अनेक तज्ज्ञांचा असा विश्वास व्यक्त केलाय की, स्तनपान करणारी माता अधिक लवकर वजन कमी करू शकतात. 

पाण्याचं सेवन

जर महिलांना पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही पाण्याचं सेवन करावं. शरीराला हायड्रेट ठेवूनच तुम्ही कॅलरीज बर्न करू शकता, प्रसूतीनंतर तुम्ही डिहायड्रेशनची समस्या टाळली पाहिजे. यासोबतच तुम्हाला पुरेशी झोप घ्यावी लागेल, झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात जळजळ होते आणि कॉर्टिसोल जे स्ट्रेस हार्मोन आहे त्याचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे वजन वाढू शकते.