मुंबई : सध्या सगळ्याच गोष्टींसाठी आधार आवश्यक बनले आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणे असो, आयकर रिटर्न भरणे असो किंवा फोनचा सिम घेणे, कोरोना चाचणी घेणे किंवा पत्ता पुराव्यासाठी वापरणे यासारख्या काही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी गरज लागते ती, आधारकार्डची. परंतु अनेकदा होते असे की, आपण काही वर्षांआधी आधार काढलेला असतो, ज्यामुळे आपल्याला आपल्या आधारशी लिंक असलेला फोननंबर आठवत नाही किंवा काही वेळेला आपला फोन हरवतो किंवा सिमकार्ड काही कारणांमुळे बंद होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीत, तुम्हाला नंबर बदलायचा असेल, तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कसं सोप्या पद्धतीने तुमचा मोबाईल नंबर आधारसह कसा अपडेट करू शकता.


आधारमध्ये तुमचा मोबाईल नंबर बदलण्यासाठी तुम्ही या पद्धती वापरू शकता.


>> तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट द्या
>> आधार अपडेट/करेक्शन फॉर्म भरा
>> आधारशी जोडलेले करेक्शन फॉर्म भरा आणि सबमिट करा
>> या सेवेसाठी तुम्हाला 30 रुपये लागतील, ते जमा करा
>> तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) असलेली पावती दिली जाईल
>> यूआरएन वापरून तुम्ही जाणून घेऊ शकता की, तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या आधारमध्ये अपडेट झाला आहे की नाही
>> तुमचा मोबाईल नंबर 90 दिवसांच्या आत आधार डेटाबेसमध्ये अपडेट केला जाईल
>> आवश्यक असल्यास, तुम्ही UIDAI च्या टोल फ्री नंबर 1947 वर देखील कॉल करू शकता


आधार मध्ये मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक का आहे?


बहुतांश सेवांसाठी, तुम्हाला आधारशी जोडलेल्या क्रमांकावर OTP मिळतो. म्हणजेच, पीएफ, पेन्शन, सिम किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नेहमी त्याच मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जातो, जो तुमच्या आधारशी जोडलेला असतो. अशा स्थितीत, जर तुमचा नंबर बदलला असेल किंवा तुम्ही नवीन नंबर घेतला असेल, तर तो ताबडतोब तुमच्या आधारशी लिंक करा.


मी किती वेळा मोबाईल नंबर बदलू शकतो?


तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार डेटाबेसमध्ये तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा अपडेट करू शकता. परंतु असे केल्यावर, तुम्हाला प्रत्येक वेळी आधार अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागेल, जे 30 रुपये आहे.