मुंबई : अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना मिळणारा हाऊस रेंट अलाउंस(HRA) त्यांच्या पगारामध्येच देतात. Income tax च्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या घर भाड्याने दिले तर टॅक्सचा फायदा मिळतो. असं असलं तरी, असे बरेच कर्मचारी आहेत ज्यांना एचआरए दिला जात नाही पण ते भाड्याच्या घरात राहतात. Income tax च्या अधिनियमातील कलम 80जीजी नुसार, असे कर्मचारी देखील घरभाड्याच्या पैशांचा वापर करुन टॅक्स वाचवू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं असलं तरी, या सेवेचा फायदा घेण्यासाठी काही नियम आणि अटींची पुर्तत: करावी लागते. जसं की, जर तुम्हाला 80 जीजी नुसार टॅक्समध्ये फायदा घ्यायचा असेल तर त्या आर्थिक वर्षी एचआरए मिळालेला नसावा. जर तुमचा कोणता बिझनेस किंवा तुम्हा कुठे काम करत असाल तरी देखील तुम्ही याचा फायदा घेऊ शकता.


काय आहेत अटी?



80जीजी नुसार टॅक्समध्ये कपातीचा फायदा घेणाऱ्या व्यक्तीचं त्या शहरात घर नसावं. ज्या शहरात ती व्यक्ती काम करते त्या ठिकाणी त्याची पत्नी किंवा पती, अल्पवयीन मुलं किंवा हिंदू अविभाजित कुटूंबाच्या नावावर कोणतंही घर नसावं. ज्या शहरात तुम्ही काम करता आणि वर नमूद केल्याप्रमाणे त्या व्यक्तीच्यासंबंधीत कोणत्याही व्यक्तीकडे घर असेल तर 80जीजी नुसार टॅक्समध्ये कपातीसाठी क्लेम करता येणार नाही.


कोण करु शकतो टॅक्स कपातीवर दावा?



तुम्ही ज्या शहरात काम करता त्या ठिकाणी स्वत:चं घर नसावं. तुम्ही दुसऱ्या शहरातील घराचे मालक असाल तर काही अडचण नाही. करदात्याला 10 बीए नावाचा एक फॉर्म भरावा लागेल. यानंतरच तुम्ही करात सूट मिळवण्यासाठी दावा करु शकता. त्याचबरोबर, करदात्याने अल्टरनेटिव्ह किंवा नव्या कर व्यवस्थेचा पर्याय निवडला तर ती व्यक्ती हा दावा करु शकत नाही.


80जीजी नुसार किती सूट मिळते?



या कलमानुसार, तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपयांपर्यंत भाडं किंवा वर्षभराच्या एकूण 25 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. Income tax च्या कलम 80 नुसार चॅप्टर 6ए चा भाग आहे. यामध्ये 19 कलमं आहेत ज्यांच्या नुसार तुम्ही टॅक्समधून तुम्हाला सूट मिळू शकते ज्याचा फायदा घेऊ शकता.