तुमचं जुनं PF खातं नव्या PF खात्याशी कसं जोडाल? आधार कार्डचीही लागेल मदत
https://iwu.epfindia.gov.in/eKYC/ या वेबसाइटला भेट देऊ शकता.
मुंबई : EPF च्या प्रत्येक खातेधारकांना एक UAN नंबर दिला जातो. जेव्हा कर्मचारी एक नोकरी सोडून दुसर्या कंपनीकडे जातो, तेव्हा त्याला नवीन ईपीएफ PF खाते उघडावे लागते. नवीन ईपीएफ खाते उघडल्यास नवीन ईपीएफ खाते क्रमांक जुन्या UAN क्रमांकाशी जोडणे आवश्यक असते. आधी फक्त कंपनीला नवीन ईपीएफ खाते क्रमांक जुन्या UAN क्रमांकाशी जोडण्याचा अधिकार होता आणि त्यामुळे खातेधारकांना खूप त्रास सहन करावा लागत होता.
पण आता नवीन ईपीएफ खाते क्रमांक जुन्या UAN क्रमांकाशी जोडण्यासाठी ईपीएफओ कार्यालयाभोवती घिरट्या घालण्याची गरज नाही. आता घर बसल्या आधार कार्डच्या साहाय्याने तुम्ही तुमचा नवीन ईपीएफ खाते क्रमांक जुन्या UAN क्रमांकाशी सहज जोडता येणार आहे. जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्ड बरोबर रजिस्टर्ड असेल, तर तुमचा यूएएन नंबर जोडणे अगदी सहज शक्य होणार आहे.
नवीन PF खाते क्रमांक जुन्या UAN क्रमांकाशी कसे जोडणारं?
१) पीएफ (PF) खातेधारकांनी प्रथम आपल्याला www.epfindia.gov.in वेबसाइटवर लाग इन करा.
२) नंतर तुम्हाला वेबसाइटवर 'ऑनलाइन आधार वेरीफाईड यूएएन अलोटमेंट' या पर्यायावर क्लिक करा.
३) यानंतर, आपल्याला आपला आधार कार्ड नंबर टाका आणि 'जनरेट ओटीपी' पर्यायावर क्लिक करा. नंतर, तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवर एक OTP - ONE TIME PASSWORD येईल.
४) OTP नंबर टाकल्यानंतर तुम्हाला 'रजिस्टर' या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
५) यानंतर आपला यूएएन नंबर जनरेट होईल.
हा UAN आपला आधार जोडलेला असणे आवश्यक आहे.
आपला आधार यूएएनशी जोडलेला आहे की नाही हे कसे जाणून घ्यावे ?
https://iwu.epfindia.gov.in/eKYC/ या वेबसाइटला भेट देऊन तुमचा आधार यूएएनशी जोडलेला आहे की नाही ही माहिती मिळवू शकता.
या साईटवर तुम्हाला तुमचा यूएएन क्रमांक टाकावा लागेल. यूएएन नंबर टाकल्यावर लगेच तुमच्या रेजिस्टर मोबाइल नंबरवर एक OTP पाठविला जाईल, जो तुम्हाला तुमचा आधार UAN क्रमांकाशी जोडला आहे की नाही हे कळवेल.