एकाच UAN क्रमांकावर दोन EPF Account? कशी मर्ज करावीत एकाहून अनेक खाती? पाहा संपूर्ण प्रक्रिया
How to Merge Two EPF Accounts : खासगी क्षेत्रामध्ये नोकरी करणारी मंडळी काही वर्षे एका संस्थेमध्ये काम केल्यानंतर ठराविक कालावधीनंतर नव्या नोकरीचा शोध घेतात.
Two EPFO Account Merge Process: खासगी क्षेत्रातील नोकरीमध्ये निर्माण झालेले पर्याय आणि त्यामुळं मिळणाऱ्या वाढीव पगाराची सुविधा पाहता एक मोठा वर्ग आहे जो ठराविक वर्षांनंतर नोकरी बदलण्याच्या विचार करतो. तुम्हीही चांगला पगार आणि चांगल्या सुविधांच्या शोधात नोकरी बदलली आहे का? तर, एक बाब लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा एखाद्या संस्थेत नोकरी करणं थांबवता तेव्हा कंपनीच्या वतीनं तुमच्यासाठी दिला जाणारा पीएफ बंद केला जातो. तर, नव्या संस्थेत रुजू होताच त्या संस्थेकडून तुमचं नवं पीएफ अकाऊंट सुरु करण्यात येतं.
अनेकदा कर्मचाऱ्यांचा असा समज होतो की, त्यांचा UAN क्रमांक एक असला म्हणजे त्यांचं पीएफ खातंही एकच असतं. पण, तसं नाहीये. नोकरी बदलल्यानंतर तुमचं पीएफ खातंही नव्यानं तयार होतं. थोडक्यात एका UAN क्रमांकाअंतर्गत तुमची एकाहून अधिक खाती तयार होतात. ही खाती मर्ज न केल्यास संपूर्ण रक्कम एकाच ठिकाणी दिसत नाही.
हेसुद्धा वाचा : Microsoft च्या कर्मचाऱ्यांचा रॉयल कारभार; कंपनी देतेय 'या' जीव ओवाळून टाकणाऱ्या सुविधा
पीएफ अकाऊंट मर्ज करण्यासाठी तुमचा युएएन क्रमांक अॅक्टीव्ह ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्हीही काही आर्थिक गरजांसाठी पीएफ खातं मर्ज करण्याच्या विचारात आहात का? ते मर्ज करण्याची प्रक्रिया माहिती नाहीये? पाहून घ्या सविस्तर प्रक्रिया...
EPF अकाऊंट मर्ज करण्यासाठी काय करावं?
- EPF अकाऊंट मर्ज करण्यासाठी सर्वप्रथम https://www.epfindia.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्या.
- यानंतर सर्विसेस सेक्शनवर जाऊन For Employees पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्यासमोर एक पेज सुरु होईल. इथं तुम्हाला One Employee - One EPF Account हा पर्याय दिसेल.
- वरील पर्याय निवडल्यानंतर तिथं यूएएन, पासवर्ड आणि कॅप्चा देऊन लॉगईन करा.
- यानंतर तुमच्यासमोर नवं पेज सुरु होईल जिथं तुम्हाला जुन्या पीएफ खात्यांचीही माहिती मिळणार आहे.
- तुम्ही ईपीएफ अकाऊंट क्रमांक टाईप करून सबमिट केल्यास तुमची अकाऊंट मर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
- तुमच्या सध्याच्या संस्थेला हे Application अप्रूव्ह करावं लागेल. त्यानंतरच तुमचं EPFO अकाऊंट मर्ज होईल.