Microsoft च्या कर्मचाऱ्यांचा रॉयल कारभार; कंपनी देतेय 'या' जीव ओवाळून टाकणाऱ्या सुविधा

Microsoft News : खासगी क्षेत्रांमध्ये नोकरीला असणाऱ्या मंडळींना दणकट पगार आणि त्याहूनही कमाल सुविधा दिल्या जातात हे अनेकांनीच ऐकलं असेल. पण, सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ हे अधिक स्पष्ट करून सांगत आहे. 

Feb 15, 2024, 15:12 PM IST

Microsoft News : मागच्या काही वर्षांमध्ये जितकी प्रगती सरकारी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये झाली तितकीच किंबहुना त्याहूनही जास्त प्रगती खासगी क्षेत्रांनी केली. 

1/7

कंपनीतील सुविधा

job news Microsoft Employees Perks will amazed you

Microsoft News : आमच्या कंपनीनं अमुक सुविधा दिली, आमच्या कंपनीनं इतकी सुट्टी, तितका पगार, एवढा बोनल, जबरदस्त कॅन्टीन दिलं असं म्हणत बरीच मंडळी त्यांच्या त्यांच्या कंपनीची प्रशंसा करत असतात.   

2/7

मायक्रोसॉफ्ट

job news Microsoft Employees Perks will amazed you

कर्मचाऱ्यांचा आनंद केंद्रस्थानी ठेवणाऱ्या अशाच कंपन्यांमध्ये येणारं एक नाव म्हणजे, मायक्रोसॉफ्ट. नुकताच सोशल मीडियावर हैदराबाद मायक्रोसॉफ्टचा एक व्हिडीओ शेअर केला. कंपनीकडूनच तयार करण्यात आलेल्या या व्हिडीओमुळं कंपनीत डोकावण्याची संधी अनेकांनाच मिळत आहे. 

3/7

मायक्रोसॉफ्टचं ऑफिस

job news Microsoft Employees Perks will amazed you

हैदराबादमधील 54 एकरांच्य़ा भूखंडावर परसलेल्या क्षेत्रामध्ये मायक्रोसॉफ्टचं ऑफिस उभं आहे. इथं तुम्हाला पर्यावरणस्नेही बांधकाम केल्याचं पाहायला मिळतं. हायटेक सुरक्षा, विजेची कमाल बचत असणाऱ्या इमारती इथं आहेत. 

4/7

कॅफेटेरिया 24 तास सुरुच

job news Microsoft Employees Perks will amazed you

मायक्रोसॉफ्टची जगभरात विविध देशांमध्ये कार्यालयं आहेत. त्यात भारतातील हे ऑफिस जरा खासच आहे. इथं कॅफेटेरिया 24 तास सुरुच असतो. जिथं जाऊन कर्मचारी त्यांच्या आवडीचे स्नॅक्स, ड्रिंक्स आणि हेल्थ ड्रिंक्स घेऊ शकतात. 

5/7

विश्रांतीसाठी एक खोली

job news Microsoft Employees Perks will amazed you

मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमध्ये प्रत्येक मजल्यावर कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीसाठी एक खोली आहे. जिथं चहा, कॉफी, फ्लेवर्ड वॉटर, लस्सी अशा पेयांची व्यवस्था आहे. संपूर्ण ऑफिसमध्ये कर्मचारी कुठंही कॉफी पिऊ शकतात.   

6/7

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी

job news Microsoft Employees Perks will amazed you

मायक्रोसॉफ्टमध्ये कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्यात येत असून, त्यांच्या फिटनेससाठी इथं जिमचीही व्यवस्था आहे. आश्चर्य म्हणजे ऑफिस जीम असूनही कंपनीमध्ये जीम ट्रेनर आणि फिटनेस क्लास अशा सुविधा पुरवण्यात येतात. याशिवाय कंपनीमध्ये 24 तास डॉक्टर सेवेत असतात.   

7/7

करमणूक

job news Microsoft Employees Perks will amazed you

कंपनीमध्ये कर्मचारी कामाव्यतिरिक्त अधूनमधून करमणुकीची साधनंही वापरु शकतात. यामध्ये एक ओपन थिएटर त्यांची मदत करतं. इथंच कंपनीच्या लहानमोठ्या पार्टी पार पडतात. कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्ट कॅम्पसमध्ये एटीएम, एसी बस, लायब्ररी या आणि अशा इतरही सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. (सर्व छायाचित्र- सोशल मीडिया)