२ हजारांची नोट बदली करण्याच्या नादात तुम्हाला खोट्या नोटा तर नाही मिळाल्या?; अशा ओळखा बनावट नोटा
How To Spot A Fake Currency Note: नोटबंदीची पुन्हा घोषणा झाल्याने नागरिक पुन्हा धास्तावले आहेत. आजपासून बँकेत नोटा बदलून घेता येणार आहे. त्यापूर्वीच काही जण इतर अनधिकृत पर्यायांकडूनही नोटा बदलून घेत आहे. मात्र, त्यामुळं त्यांची आर्थिक फसवणूक होत आहे.
मुंबईः भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) १९ मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोचा चलनातून बाद करत असल्याची घोषणा केली. २०१९नंतर पुन्हा नोटबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्णा झाले आहे. आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बदलवून घेण्यासाठी नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. (2000 note exchange) २३ मे २०२३पासून ते ३० सप्टेंबरपर्यंत नागरिक नोटा बँकेतून बदलून घेऊ शकतात. लोक नोटा बदलून घेण्यासाठी घाई करताना दिसून येत आहे. नोटा बदलून घेण्यासाठी इतर पर्यायांचाही वापर करताना दिसून येत आहे. त्यामुळं नागरिकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर येत आहे. तुम्हीदेखील या फसवणुकीपासून वाचण्यासाठी बनावट नोटा कशा ओळखायच्या हे एकदा तपासून पाहा. (2000 Note Exchange In Marathi)
बनावट नोटांचे रॅकेट
बिहारमध्ये पोलिसांना बनावट नोटांची छपाई करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सोमवारी छापेमारी करत १ लाख ७७ हजार नकली नोटां जप्त केल्या आहेत. बिहारसारखाच देशातील इतर राज्यातही असे रॅकेट सक्रीय असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळं तुम्हीही नोटा बदली करण्यासाठी जात असताना सावध राहा. तसंच, बॅकेव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून नोटा बदली करुन घेत असाल तर नोटा खऱ्या आहेत की खोट्या, याची अशी खातरजमा करुन घ्या. आरबीआयने जारी केलेल्या या सूचनांवर एक नजर मारुया.
2000 च्या नोटेसंदर्भात महत्त्वाची अपडेट! SBI ने जारी केले परिपत्रक
खरी नोट कशी ओळखाल
२००० रुपयांची नोट बदली करण्याच्या बदल्यात तुम्हाला जर ५०० रुपयांच्या नोटा मिळत असतील तर तुम्हाला आरामात खऱ्या नोटांची खात्री करता येईल. रिझर्व्ह बॅकेनुसार, ५०० रुपयांच्या नवीन नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो आणि भारतीय बँक गव्हर्नर यांची सही असते. त्याचबरोबर नोटावर लाल किल्याची प्रतिकृतीही आहे. ५०० रुपयांच्या नोटेचा रंग स्टोन ग्रे आहे. आरबीआयनुसार, नोटेचा आकार ६३ मिमि X १५० मिमि आहे.
५०० रुपयांच्या नोटेचे वैशिष्ट्ये
आरबीआयनुसार, ५०० रुपयांच्या नोटेवर काही वैशिष्ट्य आहेत. नोटेवर देवनागरीमध्ये मूल्यवर्ग अंक ५०० आहेत. त्याचबरोबर महात्मा गांधी यांचा फोटो मधोमध आहे. मायक्रो लेटर्समध्ये भारत आणि इंडिया लिहलं आहे. ५०० रुपयांची नोट थोडी मुडपल्यानंतर त्यातील धाग्याचा हिरवा रंग थोळा निळसर दिसतो.
बंदी घालताच सरकारी कार्यालयाजवळ सापडल्या 2 हजाराच्या नोटा; 1 किलो सोनंही जप्त
२००० रुपयांची खरी नोट कशी ओळखाल
२०००च्या नोटेच्या मागच्या बाजूला मंगळयाना छापले आहे.
नोटेची साइज ६६ एमएमX १६६ एमएम आहे.
नोटेवर २००० अंक स्वरुपात लिहल्यानंतर तिथेच गुप्त स्वरुपात २,००० रुपयांची इमेजदेखील आहे. नोटेवर इलेक्ट्रोटाइप (२०००) वॉटरमार्कदेखील आहे.