नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झडप झाल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. या दरम्यान, लडाखमध्ये मेजर जनरल रँकच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली आहे. याआधी मंगळवारी सकाळी सुरक्षा मंत्रालयाचीही एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये राजनाथ सिंह, बिपिन रावत आणि तिन्ही सेना दलाचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे वाढत्या तणावामुळे LACवर हाय अलर्ट आहे. हिमाचलमधील किन्नोर आणि लाहोल, स्पीती, उत्तराखंडमधील चमोली आणि पिथौरागड, सिक्कीम, अरुणाचलमध्येही सेनेला तैनात करण्यात आलं आहे. उत्तर, पश्चिम आणि पूर्व भारतातील प्रत्येक एअरबेस आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार करण्यात आला आहे. याशिवाय समुद्री गस्तदेखील वाढवण्यात आली आहे. IndiavsChina


'ते शत्रूचा खात्मा करता करता शहीद झाले; हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही'


एएनआय वृत्तसंस्थेने, लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाल्याची माहिती दिली. त्यानुसार, 


16 बिहार रेजिमेंट - 12 जवान शहीद
12 बिहार रेजिमेंट - 1 जवान शहीद
3 पंजाब रेजिमेंट - 3 जवान शहीद
6 मीडियम रेजिमेंट - 2 जवान शहीद
81 फिल्ड रेजिमेंट - 2 जवान शहीद झाले आहेत. 


भारत-चीन तणाव: श्रीनगर-लेह महामार्ग वाहतुकीसाठी बंद


लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर चीनी सैनिकांकडून झालेल्या हिंसक झडपेमुळे संपूर्ण देशात याबाबत राग व्यक्त केला जात आहे. उत्तराखंडला लागून असलेल्या भारत-नेपाळ आणि भारत-चीन सीमा भागातील लोक सरकारकडे चीनवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. सीमावर्ती भागातील लोक चिनी राष्ट्रपतींचा पुतळा जाळण्याचं आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचंही आवाहन करत आहेत.


India-China Clash : चीनचा कमांडिंग ऑफिसर ठार


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गलवान खोऱ्यात रात्रीच्या अंधारात नदीत किंवा दरीत पडल्यानंतर अनेक सैनिकांचा मृत्यू झाला. चीनी सैनिक खिळे लावलेले दंडुके आणि काटेरी तारांनी लपटलेल्या लोखंडी सळ्यांसह पूर्ण तयारीसह आले असल्याचीही माहिती आहे.


चीन-भारत संघर्षात भारताकडूनही चीनचे तब्बल ४३ जवान या झटापटीत मारले गेले आहेत. याशिवाय, चीनचे अनेक जवान गंभीर जखमी असल्याचीही माहिती मिळत आहे.