Income Tax Raid : आयकर विभागाने बुधवारी झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्याशी संबंधित तीन राज्यांतील अर्धा डझन ठिकाणी छापे टाकले. ओडिशाच्या आयकर विभागाच्या पथकाने माहितीवरून ही छापेमारी केली आहे. दुसरीकडे बुधवारी बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर छापा टाकून कंपनीच्या आवारातून आयकर विभागाने मोठ्या प्रमाणात चलनी नोटा जप्त केल्या आहेत.  बुधवारपर्यंत 50 कोटी रुपयांच्या नोटांची मोजणी पूर्ण झाली होती, मात्र नोटांची संख्या जास्त असल्याने मशिन्सने काम करणे बंद केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडवर करचुकवेगिरीच्या संशयावरून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी अनेक ठिकाणी छापे टाकले होते. आयकर विभागाची सहा पथके सकाळपासून तपास करत आहेत. आयकर विभागाच्या पथकासोबत सीआयएसएफचे जवानही सामील आहेत. त्यातच आयकर विभागाला 50 कोटींची रक्कम सापडली आहे. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटोमध्ये 100, 200 आणि 500 च्या नोटांचे बंडल एका कपाटामध्ये दिसत आहेत.



दरम्यान, ही कंपनी राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी 7.00 वाजता ओडिशातील चार आणि झारखंडमधील दोन ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली. यामध्ये ओडिशातील बौद्ध, रायडीह, संबलपूर आणि बालंगीर जिल्ह्यांतील कंपनीचे संचालक आणि ठिकाणांचा समावेश आहे. त्याचबरोबर झारखंडमधील रांची आणि लोहरदगा येथील कंपनीच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात येत आहेत.


बीडीपीएल समूहाचे मुख्यालय ओडिशा येथे आहे. या समूहात बीडीपीएलसह चार कंपन्या आहेत. इतर तीन कंपन्यांमध्ये बलदेव साहू इन्फ्रा लिमिटेड, क्वालिटी बॉटलर्स आणि किशोर प्रसाद-विजय प्रसाद बेव्हरेज लिमिटेड यांचा समावेश आहे. बलदेव साहू इन्फ्रा लिमिटेड फ्लाय अॅश विटांचे काम करते, तर उर्वरित तीन कंपन्या मद्य व्यवसायात गुंतलेल्या आहेत. बीडीपीएल समूहातील सर्व कंपन्यांचा आयकर विभागाने छाप्याच्या कक्षेत समावेश केला आहे.