Budget 2023 New vs Old Income Tax Regime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपला चौथा अर्थसंकल्प  सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. मात्र, जुना आणि नवीन कर यापुढे तुम्हाला निवडता येणार आहेत. ( Budget 2023 Income Tax Slabs) याचा काय फायदा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.  ( Budget 2023 Income Tax Slabs in Marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Budget 2023 Updates :  मोदी 2.0 सरकारच्या पूर्ण अर्थसंकल्पात या महत्वाच्या घोषणा


बजेटमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा करसवलतीचा दिसून आला आहे.  (Income Tax Regime) गेल्या आठ वर्षांमध्ये करमुक्त उत्त्पन्नाची मर्यादा वाढलेली नव्हती.  2014 मध्ये मोदी सरकारने टॅक्सची मर्यादा 2 लाख रुपयांवरुन अडीच लाख रुपये केली होती. मात्र त्यानंतर टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. ही मर्यादा यंदा तरी वाढवावी अशी मागणी नोकरदारांनी केली होती. दरम्यान, ही मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढेल, अशी अपेक्षा असताना थेट 7 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे आता यापुढे 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त झाले आहे.



करदात्यांसाठी महत्त्वाची गोष्ट


निर्मला सीतारामण यांनी करदात्यांसाठी नवीन कर स्लॅब सादर केला. नवीन टॅक्स स्लॅबमध्ये करदात्यांना जुन्या टॅक्स स्लॅबपेक्षा जास्त कर सवलती देण्यात आल्या आहेत. नवीन कर स्लॅब 1 एप्रिल 2020 पासून लागू झाला आहे. आता कोणता स्लॅब निवडायचा हे तुम्ही तेव्हाच ठरवू शकता. जेव्हा तुम्हाला दोन्हीचे फायदे आणि तोटे माहीत असतील. या दोन्हीचे फायदे आणि तोटे काय आहेत हे देखील जाणून घ्या.


नवीन टॅक्स स्लॅब नुसार करप्रणाली खालील प्रमाणे असणार आहे.


असा असेल नवीन टॅक्स स्लॅब
Income               Tax  
0 ते 3 लाख            0 %
3 ते 6 लाख             5 %
6 ते 9 लाख            10 %
9 ते 12 लाख          15 %
12 ते 15 लाख         20 %
15 लाखांपेक्षा जास्त  30 %


नवीन टॅक्स स्लॅबमध्ये काय मिळणार फायदे?


  • भाड्यावर होणार डिडक्शन..

  • शेतीचे उत्पन्न.

  • PPF वर मिळणारे व्याज.

  • विम्याची म्युच्योरिटी रक्कम.

  • रिटायरमेंट वर लिव्ह इन्कॅशमेंट.

  •  मृत्यूनंतर विम्याची मिळणारी रक्कम. 

  • सेवानिवृत्तीवर रोख रक्कम  

  • VRS म्हणजे स्वेच्छानिवृत्ती.

  • सुकन्या समृद्धी खात्यावर मिळणारे व्याज आणि परिपक्वता रक्कम.


जुन्या टॅक्स स्लॅबवर काय मिळतात फायदे?


  • होम लोनमधील प्रिसिंपल आणि व्याज

  • PPF आणि EPF मधील गुंतवणूक

  • ठेवींवरील व्याज उत्पन्न

  • मुदत ठेवीतून उत्पन्न

  • मुलांची शिक्षण फी

  • पगारदार कर्मचार्‍यांसाठी 50,000 रु.ची स्टॅंडर्ड डिडक्शन

  • एलटीए म्हणजे रजा प्रवास भत्ता

  • घर भाडे भत्ता

  • वैद्यकीय आणि विमा खर्च

  • 80 डीडी दिव्यांगांच्या उपचारांवर कर सूट

  • 80U अंतर्गत दिव्यांगांच्या खर्चावर कर सूट

  • शैक्षणिक कर्जावर 80e कर सूट

  • कलम 16 - करमणूक भत्ता

  • 80 GG घराच्या भाड्यावर सूट

  • 80G - देणगी (दानावर सूट)

  • 80 EEB - इलेक्ट्रिक वाहनावरील कर सवलत


करदात्यांसाठी कोणता टॅक्स स्लॅब चांगला?


करदात्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नवीन टॅक्स स्लॅब निवडून तुम्ही आयटीआर भरला आणि पुढच्या वर्षी तुम्हाला नवीन टॅक्स स्लॅबमध्ये अधिक फायदा मिळेल असे वाटत असेल, तर आरामात त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याचप्रमाणे, आपण उलट देखील करु शकता. परंतु हा लाभ विशिष्ट वर्गाच्या करदात्यांना दिला जातो. नोकरदार व्यक्ती नवीन स्लॅबवरुन पुन्हा जुन्या स्लॅबवर स्विच करु शकतात. ज्यांना पगार , भाडे किंवा इतर स्त्रोतांमधून उत्पन्न आहे त्यांच्याबरोबर ते प्रत्येक वेळी त्यांचा कर स्लॅब बदलू शकतात. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्ही तुमचा कर स्लॅब एकदाच बदलू शकता, हे लक्षात घ्या.