मुंबई : कोरोना व्हायरचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. ही साखळी तोडण्यासाठी अनेक स्तरांमधून विविध उपाय राबवले जात आहेत. तरी देखील कोरोनाचा उद्रेकचा थांबत नसल्याचं चित्र संपूर्ण जगासमोर आहे. गेल्या काही महिन्यांपासून फैलत असलेल्या कोरोना विषाणूमुळे देशाची आर्थिक घडी देखील विस्कटली आहे. सर्वच देश या महामारीमुळे आलेल्या संकटांना तोंड देत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात गेल्या २४ तासांमध्ये ९४ हजार ३७२ नव्या रुणांची नोंद झाली असून ११४ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ४७ लाख ५४ हजार ३५७  नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर  ७८ हजार ५८६  रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.



अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात ९ लाख ७३ हजार १७५ रुग्णांवर उपचार सुरू असून ३७ लाख २ हजार ५९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  


महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १०, ३७, ७६५ वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी २,७९,७६८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ७,२८,५१२ लोकांना कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत कोरोनामुळे राज्यातील २९११५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.