India Weather Alert : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे (heavy rain) पूरस्थिती कायम आहे. दिल्ली आणि हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर होत असल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुरामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. नवी दिल्लीतील (News Delhi) बऱ्याच महत्त्वाच्या ठिकाणी पाणी भरल्याने चर्चेचा विषय ठरत आहेत. राजधानी दिल्लीत यमुनेच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. यमुनेचे पाणी ज्या भागात पोहोचले होते, तिथून हळूहळू पाणी कमी होत आहे. त्याच वेळी, भारतीय हवामान विभागाने (IMD) रविवारी पहाटे आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर दुपारच्या वेळी हलक्या ते मध्यम पावसासाची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्या राज्यात पावसाचा इशारा?


भारतीय हवामान विभागाने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि ओडिशा साठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंडमध्ये पुढील तीन दिवस म्हणजे रविवार (16 जुलै), सोमवार (17 जुलै) आणि मंगळवार (18 जुलै) मुसळधार पावसाची शक्यता आहे.


हिमाचलमध्ये मुसळधार पावसाची शक्यता


हिमाचल प्रदेशातील बिलासपूर, सोलन, शिमला, सिरमौर, उना, हमीरपूर, मंडी, कांगडा, किन्नौर आणि कुल्लू जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कांगडा, सोलन, सिरमौर, बिलासपूर, सोलन, शिमला, सिरमौर, उना, हमीरपूर, बिलासपूर, कुल्लू आणि किन्नौर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 2-3 तासांत शिमला जिल्हा (चौपाल, दोदरा कावर), किन्नौर (सांगला), कांगडा (नूरपूर) आणि लगतच्या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.


मुंबईत कसे असेल हवामान?


पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी पुढील पाच दिवसांसाठी जारी केलेल्या 'जिल्हा अंदाज आणि चेतावणी'मध्ये मुंबईसाठी ग्रीन अलर्ट बदलून यलो यलर्ट दिला आहे.



देशाची काय परिस्थिती?


दरम्यान, आयएमडीनुसार, पुढील पाच दिवसांत मध्य आणि लगतच्या पूर्व भारतावर सक्रिय मान्सूनची स्थिती अपेक्षित आहे. ईशान्य भारतात पावसाची क्रिया हळूहळू कमी होण्याची अपेक्षा आहे. पश्चिम किनारपट्टीवर पावसाच्या हालचालींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अर्ध्याहून अधिक भारताला पाऊस आणि पुराचा तडाखा बसला आहे. उत्तराखंडमधील हवामान खराब होण्याच्या इशाऱ्यानंतर, चमोली जिल्ह्यात भूस्खलन झाले आहे, त्यानंतर बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आला आहे, तर हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त होत आहेत. बिहारमधील मुसळधार पावसानंतर पाटण्यातील विधानसभा संकुलाला तलावाचे स्वरूप आले असून, शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पंजाबलाही पावसाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक भाग जलमय झाले असून, त्यानंतर लोकांना वाचवून सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे. दरम्यान, उत्तराखंडपासून सिक्कीमपर्यंत आणि कर्नाटकपासून गोव्यापर्यंत देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.