नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करुन दावा केला आहे की, भारतीय लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं आहे. भारतीय वायुदलाचे विमान मुजफ्फराबाद सेक्टरमधून पीओकेमध्ये घुसून बालाकोट येथे बॉम्ब टाकले. यानंतर पाकिस्तानच्या विमानांनी भारताच्या विमानांवर मिसाईल सोडले. त्यानंतर भारतीय विमान भारतात परतले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दाव्यानंतर पाकिस्तानी पत्रकार अर्सलान सिद्दीकी यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तान सेना भारतीय लढाऊ विमानांवर फायरिंग केली. त्यानंतर भारतीय विमान परतले. पण या व्हिडिओची अधिकृत पुष्टी अजून करण्यात आलेली नाही.



पत्रकार अर्सलान सिद्दीकी यांनी म्हटलं की, मुजफ़्फराबाद सेक्टरमध्ये भारतीय विमानं घुसली. पाकिस्तानच्या वायुदलाने यानंतर कारवाई केली. पण यामध्ये कोणत्याही जीवितहानीची माहिती अजून पुढे आलेली नाही.


पाकिस्तानकडून रात्रभर फायरिंग


भारत-पाकिस्तान सीमेवर लढाऊ विमानं घुसल्यानंतर पाकिस्तानने राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर रात्रभर फायरिंग केली. अनेक ठिकाणी मोर्टार टाकले.