श्रीनगर : देशातील वातावरण नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि देशाचं सातत्याने संरक्षण करण्यासाठी तत्पर असणाऱ्या Indian Army सैन्यदल जवानांचं सामर्थ्य आता वाढलं आहे. Jammu and Kashmir जम्मू- काश्मीर प्रांतात असणाऱ्या नियंत्रण रेषेवर असणाऱ्या भागात सतत होणाऱ्या दहशतवादी कारवायांना आळा घालण्य़ासाठी आता भारतीय सैन्याच्या ताफ्यात नवी शस्त्र देण्यात आली आहेत. अधिकृत सुत्रांच्या माहितीनुसार भारतीय सैन्यगलाने १०,००० Sig Sauer असॉल्ट रायफल्सची पहिली तुकडी वापरात आणण्यास सुरुवात केली आहे. दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी उचलण्यात आलेलं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार भारताकडून ७२, ४०० रायफल्सची fast track procedures अंतर्गत तातडीने मागणी करण्यात आली आहे. ज्याचा वापर नियंत्रण रेषेपाशी असणाऱ्या जवानांचं सामर्थ्य वाढवण्यात केला जाणार आहे. दरम्यान, या प्रकारची अद्ययावत आणि सुसज्ज अशी पहिली रायफल नॉर्थन कमांडकडून वापरात आणली गेली. 



'नॉर्थन कमांड' ही भारतीय सैन्यदलाची ती तुकडी आहे, जी जम्मू काश्मीर येथे घडणाऱ्या दहशतवादी कारवायांवर करडी नजर ठेवून असते. शिवाय अशा कारवायांना आळा घालण्यासाठी काही कठोर पावलंही उचलते. 



अमेरिकन बनावटीच्या या रायफलसाठी भारताकडून जवळपास ७०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. fast track proceduresअंतर्गत हा करार करण्यात आल्यामुळे ही नवी शस्त्र अमेरिकेतच बनवली जाणार असून, वर्षभरात भारतात दाखल होतील. सीमारेषेपाशी शेजारी राष्ट्राकडून होणारी घुसखोरी, वारंवार होणारे दहशतवादी हल्ले यांना सडेतोड उत्तर देणाऱ्या १०,००० Sig Sauer असॉल्ट रायफलमुळे जवानांचंही साहस वाढेल अशा प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.