कानपूर :  कानपूरमधून एक धक्कादायक बातमी, कानपूरच्या चकेरी एअरपोर्टच्या (Kanpur Chakeri Airport) धावपट्टीवर  विमानाला अपघात होऊन आग लागली. सुदैवाने पायलट आणि एअरफोर्सचे जवान तत्परतेने बाहेर पडल्यानं बचावले. विमान लँण्ड होत असताना ही दुर्घटना घडली.  उजव्या बाजूचं इंजीन फेल झाल्यामुळे विमान अनियंत्रीत झालं. आणि आगही लागली. धावपट्टीवर लोखंडाच्या पिलरला धडक देऊन विमान थांबलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कानपूरच्या चकेरी विमानतळावर तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard) विमानाला हा अपघात झाला. हे विमान चेन्नईहून कानपूरला येत होतं. इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याने विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर विमानावरच नियंत्रण सुटलं. त्यानंतर ते विमान धावपट्टीच्या बाजूला असेल्या एका लोखंडी पिलरला धडकलं आणि थांबलं. वैमानिकाच्या हुशारीमुळे मोठा अनर्थ टळला.



तटरक्षक दलाचं डॉर्नियर-228 या विमानाचं इंजिन अचानक बिघडल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या विमानाला दोन इंजिन होते. धावपट्टीवर उतरल्यानंतर विमानाच्या उजव्या इंजिनमध्ये बिघाड झाला. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमानाने धावपट्टीवरून वेगात टेकऑफ केलं.