Indian Railways : देशातल्या `या` रेल्वे स्थानकाचं नाव वाचताना बोबडी वळेल, स्पेलिंगही बघा किती मोठी
एका झटक्यात वाचताच येत नाहीये हे नाव...
Train Ticket Booking: भारतीय रेल्वे.... सर्वसामान्यांपासून धनाढ्यांपर्यंत प्रत्येकालाच प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारी यंत्रणा. आशिया खंडातील सर्वात मोठं Railway Network म्हणूनही भारतीय रेल्वेची ओळख आहे. दर दिवशी याच रेल्वेनं असंख्य नागरिक प्रवास करतात. कोणासाठी ती Lifeline आहे, तर कोणासाठी वेगळाच दुवा. तुम्हाला माहितीये का भारतीय रेल्वेमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याविषयी वाचताना कुतूहलानं आपणही विचारात पडतो.
भारतामध्ये रेल्वेनं प्रवास करणाऱ्यंना देशात असणाऱ्या रेल्वे स्थानकांबाबत माहिती असेलच. पण, माहिती नसणाऱ्यांसाठी.... देशात बहुविध नावं असणाऱ्या रेल्वे स्थानकांविषयी बरीच चर्चा तुम्ही आम्ही पाहिली असेल. यातल्या काही स्थानकांची नावं फारच मजेशीर आहेत. (Indian Railway)
तुम्हाला माहितीये का, भारतात एक असंही रेल्वे स्थानक (Railway station) आहे ज्याचं नाव एका श्वासात घेणं भल्याभल्यांना जमलेलं नाही. हे रेल्वे स्थानक आहे, आंध्र प्रदेशात (Andhra pradesh). या स्थानकाचं नाव इतकं लक्षवेधी आहे की ते वाचताना तुमची बोबडी वळलीच म्हणून समजा. इंग्रजी वर्णमालेतही नाहीत इतकी अक्षरं या स्थानकाच्या नावात आहेत हे तुम्हाला त्याचं नाव वाचूनच लक्षात येईल.
अधिक वाचा : भारतीय महिलांसंदर्भातील चिंजाजनक बातमी; पुरुषांनो आताच वाचा आणि पश्चातापाची वेळ टाळा
Venkatanarasimharajuvaripeta अशी त्या स्थानकाही स्पेलिंग आहे. यामध्ये एकूण 28 इंग्रजी अक्षरं आहेत. तामिळनाडू सीमेला लागूनच असणारं हे स्थानक त्याच्या स्पेलिंगमुळं अनेकांच्या नजरा वळवतं.