भारतीय महिलांसंदर्भातील चिंताजनक बातमी; पुरुषांनो आताच वाचा आणि पश्चातापाची वेळ टाळा

महिलांना घरची लक्ष्मी म्हटलं जातं. असं म्हणतात की घरातली कर्ती महिला कोलमडली तर, कुटुंबाचा संपूर्ण डोलाराच कोसळतो. कारण, तिच्यात घराचा आत्मा वसतो. पण, सध्याच्या घडीला आपल्या देशातील महिलांबाबतची परिस्थिती मात्र वेगळं चित्र दाखवते. हे चित्र वेगळं म्हणण्यापेक्षा भीतीदायक आहे असं म्हणणं जास्त योग्य असेल. (Indian women and mothers are under stress and pressure of expectations)

Updated: Sep 29, 2022, 02:04 PM IST
भारतीय महिलांसंदर्भातील चिंताजनक बातमी; पुरुषांनो आताच वाचा आणि पश्चातापाची वेळ टाळा  title=
Indian women and mothers are under stress and pressure of expectations

Stress in Women : महिलांना घरची लक्ष्मी म्हटलं जातं. असं म्हणतात की घरातली कर्ती महिला कोलमडली तर, कुटुंबाचा संपूर्ण डोलाराच कोसळतो. कारण, तिच्यात घराचा आत्मा वसतो. पण, सध्याच्या घडीला आपल्या देशातील महिलांबाबतची परिस्थिती मात्र वेगळं चित्र दाखवते. हे चित्र वेगळं म्हणण्यापेक्षा भीतीदायक आहे असं म्हणणं जास्त योग्य असेल. (Indian women and mothers are under stress and pressure of expectations)

'हार्वर्ड बिजनेस रिव्‍यू' प्रदर्शित करण्यात आलेल्या एका अहवालानुसार भारतीय महिला आणि मातांना नेमका तणाव का येतो यामागचं कारण आता स्पष्ट झालं आहे. अहवालात सांगितल्यानुसार 82 टक्के महिलांना स्वत:ला द्यायला निवांत क्षण नाहीत. तर, 87 टक्के महिलांनी बहुतांश वेळा तणावाचा सामना केला आहे. 

अधिक वाचा : Navratri 2022 : देवीच्या रुपानं घरात आलेल्या महिलांना कुंकू लावताना 'या' चुका करु नका 

चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून, आपण किती आनंदात आहोत असं भासवून तुमची आई, बहीण, पत्नी, मुलगी समाजात वावरत तर असते. पण, तिच्या मनात सुरु असणारी धुसफूस, तगमग जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय कधी? वास्तव समोर आलं तर तुम्हालाही पश्चाताप होईल, की इतकी गंभीर बाब आपल्यासमोर आलीच कशी नाही. 

काय आहेत महिलांच्या तणावाची कारणं? 

सासरी तडजोड करणं... (Adjustment at inlaws place)
कोणत्याही मुलीचं आयुष्य लग्नानंतर 360 अंशानं बदलतं. एका नव्या कुटुंबासोबत ताळमेळ साधतांना महिलांची कसोटी पाहिली जाते. अहवालानुसार 25 ते 45 महिला या परिस्थितीचा सामना करतात. 

नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी... (job and family)
कुटुंब आणि नोकरीमध्ये समतोल साधण्यासाठीसुद्धा महिलांवर प्रचंड दडपण येतं. अनेकदा त्यांचे पाय जबाबदाऱ्यांच्या बेडीत अडकतात, तर अनेकदा नोकरी डोळ्यासमोर उभी ठाकते. 

बाळासाठीचं दडपण... (baby, education)
लग्नानंतर महिलांवर आणखी एका गोष्टीचा दबाव.. किंबहुना दडपण असतं. ते म्हणजे बाळाचा जन्म. बाळाची प्लानिंग कधी, घाई करा..., लग्नाला किती वर्षे झाली आता मुल पाहिदजे.. या अशा अपेक्षांचं महिलांना प्रचंड दडपण येतं. पुढे बाळाच्या जन्मानंतर एका नव्या पर्वाला अनुभवतानाही त्यांची दमछाक होते. मुलांच्या संगोपनावरूनही त्यांच्यावर अनेकदा टीकेची झोड उठते. यामुळं त्यांचं प्रचंड मानसिक खच्चीकरण होतं. 

घरात काय पदार्थ बनणार, सण- उत्सव कसे पार पडणार, मुलांचं भवितव्य काय असणार इथपासून पैशांची जुळवाजुळव, पतीचा आनंद आणि अशा असंख्य गोष्टी महिलांच्या आयुष्यात आणि त्यांच्या डोक्यात सातत्यानं सुरु असतात. ज्यामुळं दर दिवशी, क्षणोक्षणी नाही म्हटलं तरी त्या तणावाखाली असतात.