Indian Railway : रेल्वेनं आजवर सातत्यानं तिकीट आरक्षण प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. प्रवाशांचं हित केंद्रस्थानी ठेवत रेल्वे प्रशासनानं निर्णय घेतले असून, आता यामध्ये एका नव्या नियमाची भर पडताना दिसत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा नवा नियम प्रवाशांना मदत करण्याऐवजी त्यांना अडचणीत आणणारा ठरू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत अनेकदा IRCTC Account च्या माध्यमातून मित्रमंडळी किंवा ओळखीतील एखाद्या व्यक्तीला तिकीट काढून देता येत होतं. ही एक प्रकारची मदतच होती. पण, आता मात्र ही मदत महागात पडू शकते. दुसऱ्यांसाठी रेल्वे तिकीट काढण्यामागं मदतीचा हेतू असला तरीही तुमचा personal ID त्रयस्त व्यक्तीच्या तिकीट आरक्षणासाठी वापरणं हे कृत्य गुन्ह्यास पात्र असून, असं करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 


रेल्वे कायद्यातील अनुच्छेद 143 नुसार फक्त अधिकृत परवानगी असणाऱ्या एजंटनाच त्रयस्त व्यक्तींसाठी रेल्वे तिकीटांचं आरक्षण करता येणार असल्याची चर्चा आहे. या नियामांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात रेल्वे प्रशासनाच्या वतीनं कारवाई करत 3 वर्षांचा कारावास आणि 10000 रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात येईल असंही सांगितलं जात आहे, पण त्यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 


हेसुद्धा वाचा : Mumbai News : दक्षिण मुंबईतील 'हा' ब्रिटिशकालीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी 18 महिने बंद; वाहतूक कोंडी आणखी वाढणार


रेल्वेच्या नव्या नियमानुसार कोणीही व्यक्ती फक्त त्यांचं रक्ताचं नातं असणाऱ्यांसाठीच तिकीट बुक करु शकणार असून, तिकीट बुक करणाऱ्या आणि ज्यांच्यासाठी तिकीट बुक कतेलं जात आहे अशा व्यक्तींचं आडनाव एकसारखं असणं गरजेचं असेल. मित्रमंडळी किंवा ओळखीच्या एखाद्या व्यक्तीसाठी तिकीट बुक करणं इथून पुढं महागात पडू शकतं. फक्त महागात नव्हे, तर या नियमांचं उल्लंघर करणाऱ्या व्यक्तीला कारावासाची शिक्षाही भोगावी लागू शकते. तिकीट आरक्षणामध्ये सूसुत्रता आणण्यासाठी आणि कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी हे नियम आखण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, सदर प्रकरणी रेल्वे विभागानं कोणतीही अधिकृत माहिती न दिल्यानं प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तेव्हा 
आता रेल्वे विभाग यावर काय स्पष्टीकरण देतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.