तत्काळ तिकीट क्षणात बुक करा; कायम लक्षात ठेवा या Tips आणि Tricks
Indian Railway नं प्रवास करणाऱ्या अनेकांनाच प्रवासादरम्यानच्या बऱ्याच गोष्टी इतक्या सराईताप्रमाणं ठाऊक असतात की ही मंडळी रेल्वेच्या माहितीचं चालतंफिरतं गुगल ठरतात.
Indian Railway Tatkal Ticket Booking : भारतीयांच्या दैनंदिन प्रवासामध्ये रेल्वे विभागाचा मोठा वाटा आहे. प्रवास कमी अंतराचा असो किंवा लांब पल्ल्याचा रेल्वेनं कायमच प्रवाशांना चांगल्यातील चांगला अनुभव देण्याचाच प्रयत्न केला आहे. अशा या रेल्वेनं प्रवास करण्यासाठीसुद्धा काही नियम आहेत. तिकीटाचं आरक्षण, आगाऊ आरक्षण, दंडात्मक रक्कम वगैरे वगैरे निकषांचं पालन करतच प्रवाशांना रेल्वेनं प्रवास करता येतो. इथं खरी कसरत असते ती म्हणजे आपल्याला हव्या त्या ट्रेनमध्ये हवं ते आसन मिळवण्याची. पण, काही कारणास्तव अखेरच्या क्षणी प्रवासाचा बेत ठरल्यास हे 'हवं ते' मिळणं तसं कठीणच.
शेवटच्या क्षणी तिकीटाचं आरक्षण करायला गेल्यास अनेकदा Confirm Ticket मिळत नाही. अशा वेळी प्रवाशांकडे फक्त तात्काळ तिकीटांचाच पर्याय उरतो. पण, अनेकदा तात्काळ तिकीटंही संपतात आणि आता प्रवास करायचा तरी कसा? हाच प्रश्न ताटकळलेल्या प्रवाशांपुढं उभा राहतो. आता मात्र तुमची ही चिंतासुद्धा मिटणार आहे. कारण, अगदी सहजपणे तुम्हाला तात्काळ तिकीट काढता येणार आहे.
तत्काळ तिकीट बुकिंगसाठीच्या काही Tips आणि Tricks
सहसा तत्काळ तिकीटाचं बुकिंग करत असताना अनेकांचीच तक्रार असते की Internet Speed कमी असल्यामुळं एका क्षणात तिकीटं फुल्ल झाली. बुकींग करताच आलं नाही. पण, आता मात्र रेल्वेचच एक Tool वापरून तुमचा वेळ वाचणार आहे. त्यामुळं माहिती भरण्यात वेळ न घालवता तुम्हाला थेट तिकीट बुकींग करता येणार आहे. हे आहे IRCTC Tatkal Automation Tool.
IRCTC Tatkal Automation Tool हे ऑनलाईन उपलब्ध असणारं आणि अगदी मोफत वापरता येणारं एक टूल आहे. जे तिकीटाचं आरक्षण करताना तुमची मोठी मदत करणार आहे. तिकीट बुक करताना प्रवाशांना त्यांचं नाव, वय, प्रवासाची तारीख असा तपशील भरावा लागतो. यात वेळही दवडला जातो. पण, या टूलच्या माध्यमातून ही सर्व माहिती आपोआपच काही सेकंदांमध्ये Load होईल आणि तुमचा बराच वेळ वाचेल.
हेसुद्धा वाचा : दिवाळीच्या सुट्टीला जिम कॉर्बेटला भेट देणार आहात? तिकीटं तिपटीनं महाग, पाहा नवे दर
इथून पुढं तुम्ही शेवटच्या क्षणी कधी तिकीट बुक करणार असाल तर, रेल्वेचं हे IRCTC Tatkal Automation Tool वापरून पाहा. त्यासाठी खालील टप्पे महत्त्वाचे...
- सर्वप्रथम तुमच्या ब्राऊजरमध्ये IRCTC Tatkal Automation Tool डाऊनलोड करा.
- आता IRCTC मध्ये Login करा.
- तत्काळ तिकीट बुक करण्याआधी IRCTC Tatkal Automation Tool वर जाऊन तुमची माहिती भरुन ठेवा.
- यानंतर कधीही बुकींग करताना तुम्ही फक्त Load Data वर क्लिक करून ही माहिती वापरू शकता.
- तुमही सर्व माहिती एका क्लिकवर अपेक्षित रकान्यात लोड होईल, ज्यानंतर तुम्ही पेमेंट करून तत्काळ तिकीट बुक करू शकता.
थोडक्यात तिकीट काढण्यासाठी आता तुम्ही थोड्या स्मार्ट पद्धतीचा वापर करा, वेळही वाचेल आणि तिकीटही बुक करता येईल.