वाघ पाहणंही झालं महाग? तिकीटं तिपटीनं महाग, पाहा नवे दर

Jim Corbett National Park Jungle Safari : सध्या तुमच्याआमच्यापैकी बरेचजण दिवाळीच्या सुट्टीसाठी तयारी करत असतील. अनेकांनी गुगलचा आधार घेत यंदा भटकंतीसाठी कुठे जायचंय या ठिकाणांची यादी वेगळी काढली असेल.   

Sep 21, 2023, 12:56 PM IST

Jim Corbett National Park Jungle Safari : दरवर्षी काही ठराविक महिन्यांमध्ये भारतात पर्यटनाला चांगला बहर येतो. अमुक महिन्यात तमुक ठिकाणी फिरायला जायचं अशी अनेकांची समीकरणंही असतात. 

1/7

भटकंतीला येणारा पूर

Jim Corbett National Park ticket gets expensive three times know new rates

Jim Corbett National Park Jungle Safari : नोव्हेंबर- डिसेंबरचे दिवस म्हणजे भटकंतीला येणारा पूर. अशा या भटकंतीसाठी बऱ्याचजणांचं प्राधान्य असतं देशातील उत्तरेकडे असणाऱ्या हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसारख्या राज्यांना.   

2/7

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान

Jim Corbett National Park ticket gets expensive three times know new rates

उत्तराखंडमधील नैनीताल जनपद भागात असणाऱ्या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानालाही भेट देणाऱ्यांचा आकडा दरवर्षी वाढतच असतो. यंदाच्या वर्षी तुम्हीही इथं जायच्या विचारात आहात? तर, तुम्हाला आता जास्तीच्या खर्चाचा मारा सोसावा लागणार आहे.   

3/7

नवे दर

Jim Corbett National Park ticket gets expensive three times know new rates

कॉर्बेट प्रशासनानं राष्ट्रीय उद्यानात फिरण्यासाठी / जंगल सफारीसाठीचं शुल्क आता तिपटीनं वाढवलं आहे. यापूर्वी इथं एक परमिट 950 रुपयांना मिळत होतं. जे वापरून तुम्ही 4 तासांमध्ये उद्यानातील झिरना, बिजरानी, दुरागादेवी, पाखरो, ढेला, गर्जिया जॉन येथे दिवसा भेट देऊ शकत होतात. पण, आता मात्र याच परमिटचे दर 3 हजारांच्या घरात गेले आहेत.   

4/7

एका परमिटसाठी 3 हजार रुपये

Jim Corbett National Park ticket gets expensive three times know new rates

परिणामी आता तुम्हाला इथं एका परमिटसाठी 3 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. इतकंच नव्हे तर, स्थानिक प्रशासनानं कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात रात्रीच्या वेळी विश्रांती करण्यासाठी गेस्ट हाऊसचे दरही तिपटीनं वाढवले आहेत.   

5/7

विश्रामगृहांची सुविधा

Jim Corbett National Park ticket gets expensive three times know new rates

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात ढिकाला, ढेला, बिजरानी आणि जॉन या भागांत पर्यटकांच्या विश्रांतीसाठी उद्यान प्रशासनाकडून विश्रामगृहांची सुविधा पुरवली जाते. इथंही आता दरवाढ लागू करण्यात आली आहे.   

6/7

विश्रामगृहाची दरवाढ

Jim Corbett National Park ticket gets expensive three times know new rates

यंदाच्या वर्षी आता नव्यानं या उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी हे नवे दर लागू असणार आहेत. तर, रात्रीच्या वास्तव्यासाठी विश्रामगृहाची दरवाढ 15 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. तब्बल 14 वर्षांनंतर कॉर्बेट प्रशासनानं दरात हे बदल केले आहेत.   

7/7

अधिक माहितीसाठी...

Jim Corbett National Park ticket gets expensive three times know new rates

थोडक्यात आता यंदाच्या सुट्टीसाठी तुम्ही या राष्ट्रीय उद्यानाला भेट देणार असाल तर, नव्या दरानंच तुम्हाला येथील सर्व सुविधांचा उपभोग घेता येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकृत संकेतस्थळावरही मिळेल.