मुंबई : राज्यांतर्गत आणि परराज्यातील प्रवासासासाठी कायम रेल्वेला पसंती दिली जाते. खिशाला परवडेल असे तिकीट दर, वेळेत पोहचण्याची हमी आणि सुरक्षितता या त्रिसुत्रीमुळे अनेक जण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. आता आयआरसीटीसीने रेल्वे प्रवाशांना तिकीट बुकिंग नियमांमध्ये बदल करत मोठी गूड न्यूज दिली आहे. (indian railways increases the limit of online booking of tickets through irctc website or app from 12 tickets in a month to 24 tickets)
 
आयआरसीटीच्या माध्यमातून तिकीट बूक करणाऱ्यांना मोठी सुविधा मिळणार आहे. या नियमानुसार, आता प्रवाशांना एक महिन्यात आधीपेक्षा जास्त तिकीट आरक्षित करता येणार आहे. आयआरसीटीसीच्या नियमांनुसार, एका महिन्यात तुम्हाला अधिक तिकीटं काढता येतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयआयरसीटीसीच्या नियमांनुसार आधी 6 तिकीटं आरक्षित करता यायची. तसेच आधार-आयआरसीटीसीसह लिंक असल्यास 12 तिकीटं काढण्याची मुभा असायची. मात्र आता तिकीटांची मर्यादा वाढवून 12 इतकी करण्यात आली आहेत.