भारतीय रेल्वेकडून (indian railways) महिला प्रवाशांसाठी (Special Berths for Female Passengers in Trains) मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता महिलांना ट्रेनमध्ये सीटसाठी चिंता करावी लागणार नाही. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw)  यांनीही मोठी घोषणा केली आहे. नवीन घोषणेनुसार, भारतीय रेल्वे (indian railways) बस आणि मेट्रो ट्रेन प्रमाणे महिलांसाठीही जागा राखीव (Reserved seats for Female Passengers) ठेवणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये महिलांसाठी जागा आरक्षित केल्या आहेत. याशिवाय महिलांच्या सुरक्षेसाठीही आराखडा तयार करण्यात येत आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वेमध्ये महिलांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने राखीव बर्थ निश्चित करण्यासह अनेक सुविधा सुरू केल्या आहेत.


स्लीपर क्लासमध्ये सहा बर्थ आरक्षित


मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये  स्लीपर क्लासमधील महिलांसाठी सहा बर्थ राखीव असतील. राजधानी एक्स्प्रेस, गरीब रथ आणि दुरांतोसह पूर्ण वातानुकूलित एक्स्प्रेस गाड्यांच्या थर्ड एसी (3AC क्लास) मधील सहा बर्थ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत,अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.


ट्रेनच्या प्रत्येक स्लीपर कोचमध्ये सहा लोअर बर्थ, 3 टायर एसी कोचमध्ये चार ते पाच लोअर बर्थ आणि 2 टायर एसी मध्ये तीन ते चार लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिला आणि गरोदर महिलांसाठी राखीव असणार आहेत.


महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) GRP आणि जिल्हा पोलीस प्रवाशांना सुरक्षा पुरवतील. याशिवाय रेल्वे आणि स्थानकांवर महिलांसह इतर प्रवाशांसाठी जीआरपीच्या मदतीने पावले उचलली जात आहेत